शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

कॅप्टनच्या त्या खेळीने काँग्रेस हायकमांडची कोंडी, सिद्धूंच्या हातातूनही बाजी निसटली? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 18:34 IST

Amarinder Singh Vs Navjot Singh Sidhu: पंजाब काँग्रेसमधील संघर्षामध्ये नवज्योत सिंग सिद्धूंचे पारडे जड होतेय असे वाटत असतानाच अनुभवी अमरिंदर सिंग यांनी खेळलेल्या एका खेळीमुळे काँग्रेस नेतृत्वाची कोंडी झाली आहे.

चंदिगड - पंजाबकाँग्रेसमध्ये मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amarinder Singh) आणि काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेला संघर्ष सध्या शिगेला पोहोचला आहे. या संघर्षामध्ये नवज्योत सिंग सिद्धूंचे (Navjot Singh Sidhu) पारडे जड होतेय असे वाटत असतानाच अनुभवी अमरिंदर सिंग यांनी खेळलेल्या एका खेळीमुळे काँग्रेस नेतृत्वाची कोंडी झाली आहे. तसेच महत्त्वाकांक्षी नवज्योत सिंग सिद्धू यांच्या हातातूनही काही काळासाठी बाजी निसटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. (Captain Amarinder Singh's bet decision raises tensions in Congress high command, prolongs decision on Navjot Singh Sidhu)

पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद नवज्योत सिंग सिद्धू यांच्याकडे सोपवण्याबाबत काँग्रेस नेतृत्वाकडून चाचपणी करण्यात येत होती. दरम्यान, पंजाबमधील काँग्रेसच्या अंतर्गत संघर्षात नवज्योत सिंग सिद्धूंच्या बाजूने पारडे झुकत असतानाच कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या गटाने विधानसभा निवडणुकीपूर्वी कुठल्याही हिंदू नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवण्याच्या चर्चेला हवा देऊन काँग्रेस हायकमांडसमोरील अडचणीत वाढ केली आहे. त्यामुळे सिद्धूबाबतचा निर्णय लांबणीवर पडला असून, या मुद्द्यावर अद्यापही विचारमंथन सुरू आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग आणि नवज्योत सिंग सिद्धू यांच्यात सुरू असलेल्या वर्चस्वाच्या जुगलबंदीत सिद्धूंनी एक डाव खेळल्यानंतर कॅप्टनजी दुसरा डाव खेळत आहेत. काँग्रेस नेतृत्व सिद्धूंना पक्षात मोठी भूमिका देण्याची तयारी करत असताना दुसरीकडे अमरिंदर सिंग त्यासाठी फार उत्सुक नाही आहेत. त्यामुळेच नवज्योत सिंग सिद्धू यांना पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनवण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर कॅप्टनजींच्या गटाने हिंदू प्रदेशाध्यक्ष बनवण्याची पुडी सोडली आहे. त्यासाठी राहुल गांधींचे निकटवर्तीय विजय इंदर सिंगला आणि माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांची नावे पुढे करण्यात आली आहेत. हे हिंदू चेहरे पुढील निवडणुकीत हिंदू मतदारांना काँग्रेसकडे वळवण्यात यशस्वी ठरतील असा तर्क देण्यात येत आहे.

सिंगला हे राहुल गांधींचे निकटवर्तीय असल्याने कॅप्टन यांच्या गटाने त्यांचे नाव पुढे करून सिद्धू यांना रोखण्याची रणनीती आखली आहे. तसेच काँग्रेस नेतृत्व सिद्धूंना उपमुख्यमंत्री बनवून प्रचार समितीचे अध्यक्षपद देऊ इच्छित होते. मात्र सिद्धू हे त्यासाठी तयार नाहीत. दरम्यान, निर्णय घेण्यास होत असलेला उशीर आणि कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नव्या खेळीमुळे वैतागलेल्या सिद्धू यांनी पंजाबमधील विजेच्या संकटावरून मुख्यमंत्र्यांवर ट्विट करत टीका केली आहे.   

टॅग्स :congressकाँग्रेसPunjabपंजाबSonia Gandhiसोनिया गांधीNavjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPoliticsराजकारण