शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

काँग्रेस आणि भाजपातर्फे उमेदवारांची चाचपणी वेगात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 06:08 IST

या आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे.

- प्रसाद कुलकर्णीया आठवड्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होईल, असे दिसत आहे. मध्य प्रदेशात यंदाची लढाई मुख्यत: काँग्रेस व भाजपामध्येच आहे. मोदी लाटेचा प्रभाव लुप्त झाल्याचे विधानसभा निवडणुकांनी दाखवून दिले आहे. तरीही २६ फेब्रुवारीच्या एअर स्ट्राइकचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न देशभर भाजपा करणार असून, हीच काँग्रेससमोर डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत.पाकिस्तानविरुद्ध अशी लष्करी कारवाई करण्याचे धारिष्ट्य इंदिरा गांधी यांच्यानंतर नरेंद्र मोदींनी दाखविले. त्यामुळे त्या प्रचारावरून जनतेचे मन वळविण्याचे मोठे आव्हान काँग्रेसपुढे आहे. त्यामुळे स्थानिक प्रश्नांपेक्षा हाच मुद्दा कळीचा ठरतो की काय, असे वाटत आहे. पण मतदानाला वेळ असल्याने मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडू शकतात.विधानसभा निवडणुकीतील विजय ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने विन २९ हे मिशन ठरविले आहे. म्हणजे सर्व जागा जिंकण्याची काँग्रेसची महत्त्वाकांक्षी इच्छा व योजना आहे. अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले तर त्याच्या जवळ तरी जाता येते. अर्थात त्यासाठी प्रयत्नांची शिकस्त अन् जनतेचा कौल हवा. त्यामुळे काँग्रेस विचारपूर्वक नियोजनबद्ध पाऊले टाकत आहे.भिंड, ग्वाल्हेर व सीधीमध्ये मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बैठका घेतल्या. सध्या ते ठिकठिकाणी पदाधिकाऱ्यांची मते ऐकून घेत आहेत. त्यानंतरच ते या तीन मतदारसंघांचे उमेदवार ठरवतील. ग्वाल्हेर, चंबळ, अंचल या पट्यातील विभानसभेच्या ३४ पैकी २६ काँग्रेसने जागा जिंकल्या आहेत. जनमताचा हाच कौल लोकसभेत कायम ठेवण्याचा काँग्रेसचा इरादा आहे. ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे एक हुकमी एक्का मानले जाणारे उमेदवार. ते स्वत: गुना मतदारसंघासाठी इच्छुक असले तरी काँग्रेस त्यांना ग्वाल्हेरमधून उभे करू इच्छिते. गुना- शिवपुरी मतदारसंघासाठी प्रियदर्शनी राजे यांचे पारडे जड वाटते. त्यांचा जनसंपर्क पाहता पक्षश्रेष्ठी त्यांनाच अनुकूल आहेत. भिंड, सीधी व खजुराहोबाबत कमलनाथ १ मार्च रोजी उमेदवार निश्चितीबाबत अंदाज घेतील. सीधीतून कमलेश्वर पटेल, भिंडमधून महेंद्र जाटव तर खजुराहोमधून भाजपातून आलेले रामकृष्ण कुसमरिया हे काँग्रेसचे उमेदवार असू शकतील. जेथे काँग्रेसचे प्राबल्य आहे, तिथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी चाचपणी सुरू आहे.काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी पुढील आठवड्यात राज्यात १0 ते १२ सभा घेण्याची शक्यता आहे. त्याची जोरदार तयारी सुरू आहे. भाजपाही तयारीत मागे नाही. पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या सूचनांनंतर वरिष्ठ नेत्यांनी विद्यमान खासदारांचा लेखाजोखा तयार केला. त्यात २७ पैकी १४ खासदार नापास झाल्याने त्यांचा पत्ता ‘कट’ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारच्या कामांचे डांगोरे पिटत राहण्याच्या सूचना पाळण्यात हे खासदार अपयशी ठरले आणि निष्क्रियही होते, अशी तक्रार आहे.भिंडचे भागीरथप्रसाद, सागरचे लक्ष्मीनारायण यादव, मंदसौरचे सुधीर गुप्ता, भोपाळचे अलोक संजर, राजगढचे रोडमल नागर, होशिंगाबादचे उदयप्रताप सिंग, रिवा येथील जनार्दन मिश्रा, सीधी येथील रीती पाठक, उज्जैनचे चिंतामणी मालवीय, धारच्या सावित्री ठाकूर, मुरैनाचे अनुप मिश्रा खरगोनचे सुभाष पटेल यांच्यावर टांगती तलवार आहे. त्यामुळे नवे इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. भाजपाकडे हे हौशे, गवशे, नवशे आपले तुणतुणे वाजवत आहेत.अर्थात भाजपची ‘थिंक टँक’ समजले जाणारे राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रदेश प्रभारी डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्यासारख्या शांत नेत्याकडे उमेदवार निवडीची सूत्रे आहेत. ते अशा मंडळींना जवळ करण्याची शक्यता कमीच. तरीही भाजपाला बंडाळीला तोंड द्यावे लागेल आणि मतविभागणीचा फायदा आपल्याला होईल, असे काँग्रेसला वाटत आहे. भाजपला उमेदवार निवडीबाबत रा.स्व. संघही ठिकठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची मने जाणून घेऊन मदत करीत आहे.>‘ताई’ विरुद्ध ‘भाई’भाजपामध्ये सर्वाधिक चुरस इंदोरसाठी आहे. ताई म्हणून ओळखल्या जाणाºया सुमित्रा महाजन या ९ वेळा इथून विजयी झाल्या असल्या तरी आता त्यांना कडवे आव्हान भाई म्हणून ओळखले जाणारे कैलास विजयवर्गीय यांनी दिले आहे. गेल्या वेळी ताई म्हणाल्या होत्या की, इंदोर लोकसभेची चावी माझ्या हाती आहे. योग्य वेळी मी योग्य व्यक्तीकडे ती सुपूर्द करीन. पाऊणशे वय असलेल्या ताई अजूनही चावी सोडायला तयार नाहीत. कैलास विजयवर्गीय दांडगा जनसंपर्क असलेले प्रबळ उमेदवार आहेत. त्यांना दुखवणे पक्षश्रेष्ठींना परवडणारे नाही. पर्यायाने तिकिटासाठी ओढाताण झाल्यास त्याचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो. त्यामुळे इंदोरचा उमेदवार ठरविणे, ही भाजपासाठी डोकेदुखी आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९