शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

Cabinet Reshuffle: 'नारायण राणेंची उंची त्यापेक्षाही मोठी...'; संजय राऊत यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 11:41 IST

Sanjay Raut reaction on Narayan Rane: नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.

ठळक मुद्देआमच्याकडून झालेल्या पुरवठ्याबद्दल भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेतपण प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडला

मुंबई: काल नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. त्यात महाराष्ट्रातून चार खासदारांना मंत्रीपद देण्यात आले. यात भाजपचे राज्यसभा खासदार नारायण राणे यांना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राणेंच्या मंत्रीपदावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 'नारायण राणेंना सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याचे मंत्रिपद देण्यात आले. पण, त्या मंत्रीपदापेक्षा त्यांची उंची मोठी आहे. त्यांनी रोजगार आणि उद्योगांना संजीवनी द्यावी. आमच्या त्यांना शुभेच्छा,' असे राऊत म्हणाले.

माध्यमाशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले, बेरोजगारी, महागाई, आरोग्य या सगळ्या संदर्भात महाराष्ट्राच्या मंत्र्यांवर जबाबदारी आली आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला काही मंत्रिपदे आली आहेत. पण, प्रकाश जावडेकरांसारखा अनुभवी आणि ज्येष्ठ असलेला मोहरा पडला. नक्कीच नारायण राणेंना मंत्री सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खाते दिले, पण राणेंची उंची त्यापेक्षा मोठी आहे. ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अनेक मंत्रीपदे भूषविली आहे. आता फक्त राणेंपुढे रोजगार वाढवण्याचे मोठे काम आहे, असे राऊत म्हणाले. तसेच, मधल्या काळात लहान उद्योग मरून पडला होता. त्याला संजीवनी देण्याचे आव्हान राणेंसमोर आहे. रोजगार निर्मितीचे काम त्यांच्या पुढे आहे. हा व्यक्तिगत टीका टिप्पणीचा विषय नाही. राणे चांगले काम करतील. ते महाराष्ट्रात उद्योग आणतील असा विश्वासही राऊत यांनी बोलून दाखवला.

भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानावेराऊत पुढे म्हणाले, आमच्याकडून झालेल्या पुरवठ्याबद्दल भाजपने शिवसेना, राष्ट्रवादीचे आभार मानले पाहिजेत. आमच्यामुळे त्यांना मंत्रिमंडळासाठी चेहरे मिळाले. कपिल पाटील हे राष्ट्रवादीचेच प्रोडक्ट आहे. भारती पवारही राष्ट्रवादीच्याच होत्या. राणे तर शिवसेना, काँग्रेस करत भाजपमध्ये गेले. म्हणजे मंत्रिमंडळाचा मूळ चेहरा हा शिवसेना-राष्ट्रवादीचाच आहे, असा चिमटहा त्यांनी काढला. 

टॅग्स :PoliticsराजकारणNarayan Raneनारायण राणे Sanjay Rautसंजय राऊतCabinet expansionमंत्रिमंडळ विस्तार