शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

हैदराबाद महापालिकेत भाजपाची जोरदार मुसंडी; ओवेसींच्या गडाला हादरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 10:11 IST

GHMC election results 2020: भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे.

हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात झाली असून सुरुवातीला आलेल्या कलानुसार भाजपाने जोरदार मुसंडी मारलेली आहे. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या गडामध्ये भाजपा ४० जागांवर आघाडीवर असून सत्ताधारी टीआरएस १४ जागांवर आघाडीवर आहे. भाजपाने यंदा मोठमोठे नेते प्रचारात उतरविले होते. 

भाजपाला २०१६ च्या निवडणुकीत ५ जागा जिंकता आल्या होत्या. यामुळे आजची ही आघाडी भाजपाला फायद्याचीच म्हणावी लागणार आहे. ग्रेटर हैदराबाद नगर पालिका (जीएचएमसी) निवडणुकीत 1122 उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. ओवेसींच्या गडात पाय रोवण्यासाठी पहिल्यांदाच भाजपाने महापालिकेसारख्या छोट्या निवडणुकीत मोठी ताकद लावली होती. भाजपाशासित राज्यांचे मुख्यमंत्री देखील प्रचारात आले होते. केंद्रीय मंत्री अमित शहा, योगी आदित्यनाथ देखील आले होते. 

टीआरएसच्या नेत्या कविता यांनी सांगितले की, आम्ही १०० हून अधिक जागा जिंकणार आहोत. भाजपाचे मोठमोठे नेते निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी आले होते. त्यांनी मतदारांना खोटी आश्वासने दिली. मला आनंद आहे की हैदराबादच्या लोकांनी त्यावर विश्वास ठेवला नाही व केसीआरच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. 

हैदराबादमध्ये १ डिसेंबरला मतदान झाले होते.  यावेळी 46.55 टक्केच मतदान नोंदविले गेले. सत्ताधारी टीआरएस सर्वच्या सर्व १५० जागांवर निवडणूक लढवत आहे. तर भाजपा १४९ जागांवर निवडणूक लढवत आहे. एमआयएम ५१ जागांवर निवडणूक लढवत आहे. 

२०१६ चा निकाल काय होता? हैदराबाद महानगरपालिका देशातील मोठ्या महापालिकांपैकी एक आहे. यामध्ये हैदराबाद, रंगारेड्डी, मेडचल-मल्काजगिरी आणि संगारेड्डी असे चार जिल्हे येतात. या पालिकाक्षेत्रात २४ विधानसभा आणि ५ लोकसभा मतदारसंघ आहेत. २०१६ मध्ये या पालिकेत टीआरएसला ९९, ओवेसींच्या एमआयएमला ४४ पैकी ५  आणि भापालाही ५ जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला २ जागा मिळाल्या होत्या. 

टॅग्स :ElectionनिवडणूकBJPभाजपाAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीAmit Shahअमित शहाAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन