शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

उत्तर प्रदेश निवडणुकीसाठी भाजपाची जबरदस्त तयारी, एक लाख कार्यकर्त्यांची विविध विभागात करणार नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2021 15:27 IST

Uttar Pradesh elections 2022: भाजपाने राज्यातील स्थानिक पक्षांसोबत असलेल्या आघाडीला मजबूत करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

लखनौ - विधानसभा सदस्यांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (Uttar Pradesh elections 2022) भाजपाने राज्यातील स्थानिक पक्षांसोबत असलेल्या आघाडीला मजबूत करतानाच पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही खूश करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. (BJP) या माध्यमातून सुमारे एक लाख कार्यकर्त्यांची सरकारपासून पक्षसंघटनेपर्यंत नियुक्ती करण्याची योजना भाजपाने आखली आहे.  (BJP's strong preparations for Uttar Pradesh elections, will appoint one 1 lakh workers in various departments)

भाजपामधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कार्यकर्त्यांना राज्य अल्पसंख्याक आयोग, अनुसूचित जाती आयोगासह अन्य आयोग, पालिका, बोर्ड आणि समित्यांमध्ये नियुक्त करण्यात येणार आहे. संघटनेमध्ये पक्षाच्या विविध आघाड्या, विभाग आणि प्रकल्पामधील मंडळ स्तरांपर्यंत नियुक्त्या केल्या जाणार आहेत. सर्व काही व्यवस्थित झाले तर पहिल्या टप्प्यामध्ये जुलै महिन्यापर्यंत संघटना आणि सरकारमधील विविध पदांवर सुमारे एक लाखांहून अधिक कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाणार आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी जेव्हा पक्षाचे केंद्रीय संघटन मंत्री बी.एल.संतोष यांनी लखनौला भेट देत पदाधिकाही आणि कार्यकर्त्यांसोबत बैठका घेतल्या तेव्हा काही मंत्री आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर कार्यकर्त्यांना समावून घेण्याबाबत आणि नेत्यांच्या दावेदारीबाबत सरकार आणि पक्षसंघटनेतील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे. निवडणूक तोंडावर आली असल्याने या पदांवर नियुक्त्या करताना जातीय आणि विभागीय समतोल राखला जाणार आहे. 

भाजपाकडून कार्यकर्त्यांना प्रसारमाध्यम विभाग, सुशासन आणि केंद्र-राज्य समन्वय विभाग, योजना शोध विभाग, प्रसारमाध्यम संपर्क विभाग, राजकीय फिडबॅक विभाग, राजकीय कार्यक्रम आणि बैठक विभाग यामध्ये समायोजित करेल. या विभागांशिवाय कार्यकर्त्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि बचाव विभाग, साहित्य आणि प्रकाशन विभाग, व्यवस्थापन विभाग, समन्वय विभाग, निवडणूक आयोगासोबत समन्वय राखणारा विभाग, सोशल मीडिया विभाग, आयटी विभाग, आजीवन सहयोग निधी विभाग, विधी आणि न्याय विभाग, जिल्हा कार्यालय आणि निर्माण विभाग, वाचनालय, लायब्रेरी रीडिंग रूम, स्वच्छ भारत अभियान, बेटी बचाओ बेटी पढाओ, नमामि गंगे प्रकल्प, राष्ट्रीय सदस्यता अभियान राष्ट्रीय महासंपर्क अभियान आदींमध्ये कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची योजना भाजपाने आखली आहे. 

टॅग्स :BJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारणyogi adityanathयोगी आदित्यनाथ