शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

शेट्टींना सोबत घेण्याच्या भाजपाच्या हालचाली

By यदू जोशी | Updated: March 14, 2019 04:18 IST

पुण्यात झाली गुप्त बैठक; पुढील निर्णय शिवसेनेवर अवलंबून

- यदु जोशीमुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी भाजपा-शिवसेना युतीसोबत यावे यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या असून भाजपाने शेट्टी यांच्याशी संपर्क साधला आहे. त्यासाठी मंगळवारी पुण्यात एक गुप्त बैठक झाली. आता शिवसेनेने हातकणंगलेची जागा सोडली तर शेट्टी एनडीएमध्ये परततील, असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.मुख्यमंत्री कार्यालय आणि भाजपा यांच्यात समन्वयासाठी असलेले मुख्यमंत्र्यांचे ओएसडी श्रीकांत भारतीय यांनी राजू शेट्टी आणि त्यांच्या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची काल पुण्यात बैठक झाली. शेट्टी यांनी परत युतीसोबत यावे, असा प्रस्ताव त्यांना देण्यात आला.२०१४ मध्ये शेट्टी यांना भाजपा-शिवसेनेने पाठिंबा दिला होता आणि ते हातकणंगलेमधून मोठ्या मताधिक्याने विजयी झाले होते. युतीमध्ये मूळ ही जागा शिवसेनेकडे आहे. शिवसेनेच्या कोट्यातून ती शेट्टी यांना देण्यात आली होती. त्यामुळे यावेळी शेट्टी यांना पुन्हा पाठिंबा द्यायचा तर शिवसेनेकडून ती जागा घ्यावी लागेल. शिवसेनेने माजी खासदार निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांना पक्षात घेऊन त्यांची उमेदवारी जवळपास नक्की केली आहे.आता शक्यता अशी आहे की शेट्टी यांनी युतीसोबत येण्याची तयारी दर्शविली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांच्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शब्द टाकतील. ठाकरे यांच्या निर्णयावर शेट्टींचे युतीसोबत परतणे अवलंबून असेल. पुण्यातील बैठकीबाबत विचारले असता श्रीकांत भारतीय यांनी मात्र अशी बैठक झाल्याचा इन्कार केला. मात्र, शेट्टी यांना युतीसोबत आणण्याचे प्रयत्न होत असल्याच्या वृत्ताला भाजपाच्या एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला.पुण्यात बापट यांचा पत्ता कट?पुणे लोकसभा मतदारसंघात अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हे भाजपाचे उमेदवार नसतील, हे स्पष्ट झाले आहे. कारण, भाजपा-शिवसेनेने राज्यातील लोकसभा मतदारसंघांसाठी जे समन्वयक नेमले आहेत त्यात पुण्यासाठी भाजपातर्फे गिरीश बापट तर शिवसेनेतर्फे आ.डॉ.नीलम गोºहे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही उमेदवाराला अशी जबाबदारी दिली जात नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकRaju Shettyराजू शेट्टीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा