शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

J. P. Nadda : गोव्यात भाजपाचा चेहरा प्रमोद सावंतच - जे. पी नड्डा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2021 23:19 IST

J. P. Nadda : केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली.

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात यशस्वी वाटचाल सुरू आहे‌. केंद्रात श्रीपाद नाईक चांगली कामगिरी बजावत आहेत, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डा म्हणाले. २0२२ ची आगामी विधानसभा निवडणूक गोव्यात भाजप सावंत यांच्या नेतृत्त्वाखालीच लढणार हे यातून स्पष्ट झाले.

केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री दिल्लीहून स्थानिक राजकारणात येणार अशी चर्चा गेले काही दिवस आहे. गोवा दौऱ्यावर असताना नड्डा यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा श्रीपाद यांना दिल्लीहून स्थानिक राजकारणात आणणार का?, या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. कोणीही काहीही इच्छा प्रकट केली, तरी निर्णय पक्षाने घ्यायचा असतो. श्रीपाद दिल्लीत चांगले काम करत आहेत, असे ते म्हणाले.

गेले दोन दिवस गोवा दौऱ्यावर असलेले नड्डा यांनी आमदार, मंत्री, खासदार, राज्य कार्यकारणी सदस्य, पक्षाची कोअर टी. मंडलल अध्यक्ष तसेच युवा मोर्चा, महिला मोर्चा, आदी विविध आघाड्यांचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा केली. पत्रकार परिषदेस मुख्यमंत्री प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे गोवा प्रभारी सी. टी. रवी, प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे तसेच इतर उपस्थित होते.

मी आशावादी आहे...गोव्यात भाजपा आणखी वाढेल आणि पक्षाची उत्तरोत्तर प्रगती होईल याबाबत मी आशावादी आहे, असे ते म्हणाले. नड्डा म्हणाले की, २०१७ च्या तुलनेत गोव्यात आज २०२१ मध्ये भाजप पक्ष कितीतरी पटींनी वाढला आहे. राज्यात भाजपा सरकारकडून बऱ्यापैकी काम चालले आहे. कोविड महामारी व्यवस्थापन हाताळताना भाजपा सरकारने बरीच विकासकामेही केली. २०२१ पर्यंत मोपा येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्ण होईल. गोव्यात 'फार्मा हब' स्थापन करण्यासाठीही राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत. गोव्यात पक्षाच्या कामगिरीबद्दल मी समाधानी आहे. राज्यात पक्ष पूर्ण ताकदीने उभा आहे.

कर्नाटकात पेचप्रसंग नाहीच, येडियुराप्पांची चांगली कामगिरीकर्नाटकमध्ये भाजपचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा चांगले काम करीत असल्याचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी गोवा भेटीवर असताना पत्रकार परिषदेत सांगितले. कर्नाटकात नेतृत्त्वबदल होणार असे वृत्त गेले काही दिवस आहे. येडियुराप्पा यांनीही स्वत: तसे संकेत दिले होते. परंतु नड्डा यांनी एका प्रश्नावर कर्नाटकात कोणताही पेचप्रसंग नसल्याचे सांगितले. केवळ प्रसार माध्यमांनाच पेचप्रसंग दिसतो, असे नड्डा म्हणाले. 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाgoaगोवाBJPभाजपा