शहरं
Join us  
Trending Stories
1
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
5
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
6
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
7
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
8
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
9
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
10
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
11
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
12
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
13
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
14
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
15
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
16
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
17
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
18
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...
19
धक्कादायक! लिव्ह-इन पार्टनरची केली हत्या, सिग्नलवर गाडी थांबवली, पेट्रोल ओतून पेटवून दिले
20
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा

फ्री वायफायच्या पासवर्डमधून केजरीवालांची खिल्ली; डिजिटल प्रचारातून भाजपा जिंकणार दिल्ली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2019 09:39 IST

भाजपाचा डिजिटल रथ एक एप्रिलपासून रस्त्यावर धावणार

नवी दिल्ली: लोकसभा निवडणूक जिंकून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं कंबर कसली आहे. आम आदमी पार्टीची सत्ता असलेल्या दिल्लीत यश मिळवण्यासाठी भाजपानं हायटेक प्रचार सुरू केला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये करण्यात आलेल्या कामांचा प्रचार करण्यासाठी भाजपानं डिजिटल रथाची मदत घेतली आहे. या रथांवर स्क्रीन लावण्यात आली असून त्यावर मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती देणारे व्हिडीओ दाखवले जाणार आहेत. या रथाच्या माध्यमातून गल्लोगल्ली जाऊन प्रचार करणं शक्य होणार आहे. भाजपाच्या कामांची माहिती देताना, दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचं सरकार कसं अपयशी ठरलं, हे सांगण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. दिल्ली-एनसीआर भागात फिरणाऱ्या या डिजिटल रथामध्ये वायफायची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे हा रथ जिथे जाईल, त्या भागात लोकांना फ्री वायफायचा वापर करता येईल. या वायफायच्या पासवर्डमधून भाजपानं केजरीवालांवर निशाणा साधला आहे. भाजपानं वायफायचा पासवर्ड 'Kejriwal failed to give free WiFi' असा ठेवला आहे. डिजिटल रथावरील वायफायचा वापर लोकांना अगदी मोफत करता येईल, अशी माहिती दिल्ली भाजपाच्या आयटी आणि सोशल मीडियाचे प्रभारी नीलकंठ बक्षी यांनी दिली. 'या वायफायच्या माध्यमातून लोकांना मोदी आणि त्यांच्या कामाची माहिती सोशल मीडियावरुन शेअर करता येईल,' असंदेखील ते पुढे म्हणाले. एकाचवेळी 200 लोकांना फ्री वायफायचा वापर करता येऊ शकेल. 1 एप्रिलपासून हा डिजिटल रथ दिल्लीच्या रस्त्यांवर धावेल, असं बक्षी यांनी सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकBJPभाजपाAAPआपdelhiदिल्लीNarendra Modiनरेंद्र मोदीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल