BJP will winning the 'so many' seats in west bengal | Lok Sabha 2019 Exit Poll: ममतांच्या गडाला भाजपा लावणार सुरुंग, 'एवढ्या' जागा जिंकणार
Lok Sabha 2019 Exit Poll: ममतांच्या गडाला भाजपा लावणार सुरुंग, 'एवढ्या' जागा जिंकणार

कोलकाताः लोकसभा निवडणूक 2019 यंदा पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारामुळे चर्चेत राहिली आहे. भाजपाचं पश्चिम बंगालमध्ये ममतांच्या गडाला सुरुंग लावण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. मोदी-शाहांच्या या प्रयत्नाला काही प्रमाणात यश मिळतानाही पाहायला मिळतंय. आज तक आणि एक्सिस माय इंडियानं घेतलेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाला 19 ते 23 जागा मिळू शकतात. पश्चिम बंगालमध्ये लोकसभेच्या एकूण 42 जागा आहेत. यंदा भाजपाला पश्चिम बंगालमध्ये 19 ते 23 जागा मिळण्याचा अंदाज असून, काँग्रेसची फक्त एक जागा निवडून येण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये यंदा कम्युनिस्टांना खातंही उघडता येणार नसल्याचा अंदाज आहे. तर तृणमूल काँग्रेसलाही 19च्या जवळपास जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओडिशामध्येही जबरदस्त उलथापालथी होण्याची शक्यता आहे. इथे बऱ्याच वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीजेडीला मोठा फटका बसणार आहे. एक्झिट पोलनुसार, ओडिशामध्ये लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत. त्यातील भाजपाला 15 ते 19 जागा मिळण्याचा अंदाज असून, बीजेडीला 2 ते 6 जागांवर समाधान मानावं लागणार आहे. 

23 मे रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. मात्र त्याआधी विविध चॅनेल आणि दैनिकांनी सर्व्हेच्या माध्यमातून जनतेचा जाणून घेतलेला लोकसभेचा मूड यावरुन निवडणूक निकालांचे अंदाज बांधण्यात येतात. निवडणूक निकालांच्या या सर्व्हेवरून देशात कोणाचं सरकार येणार हे सांगितले जाते. निवडणूक प्रचारादरम्यान विविध संस्थांनी मतदारांमध्ये जात वेगवेगळ्या मुद्द्यावरुन राजकीय पक्ष, उमेदवार यांचा विजय, पराभव याची गणिते मांडली जातात. सी-व्होटर, सीएसडीएस, नेल्सन, लोकनिती, चाणक्य यासारख्या संस्था ओपिनियन पोल घेत असतात. या संस्थांची आपली स्वत:ची टीम असते, जी प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांची मते जाणून घेते. 


Web Title: BJP will winning the 'so many' seats in west bengal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.