शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सट्टा बाजारात मोदींची हवा; पंतप्रधानपद कायम राहण्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 11:11 IST

सत्ता बाजारातील भाजपाचं वर्चस्व कायम राहण्याचा अंदाज

भोपाळ: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा वाराणसीतून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. उत्तर प्रदेशातून मोदी आणि गुजरातमधून पक्षाध्यक्ष अमित शहा निवडणूक लढवणार असल्यानं भाजपाच्या आशा उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर सट्टा बाजारात भाजपाला झुकतं माप मिळतं आहे. आगामी निवडणूक निकालानंतरही सत्ता बाजारात भाजपाचं वर्चस्व कायम राहील, असा अंदाज मध्य प्रदेशच्या सट्टा बाजारानं व्यक्त केला आहे. यंदा भाजपाला 246 ते 249 जागा मिळतील, अशी शक्यता सट्टा बाजारातील बुकींनी वर्तवली आहे. तर काँग्रेसला 76 ते 78 जागा मिळण्याचा अंदाज आहे. याआधी राजस्थानातील सट्टा बाजारानं भाजपाला 250 हून अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता. मध्य प्रदेशच्या सट्टा बाजारानं विधानसभा निवडणुकीवेळी व्यक्त केलेला अंदाज जवळपास खरा ठरला होता. विधानसभा निवडणुकीत भाजपाला 102 आणि काँग्रेसला 116 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या या निवडणुकीत काँग्रेसला 114, तर भाजपाला 109 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपाला राज्यातील सत्ता गमवावी लागली. मात्र लोकसभा निवडणुकीतील गणितं वेगळी आहेत. विधानसभेचं मैदान मारणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत फारसं यश मिळणार नाही, असा अंदाज आहे. राज्यात लोकसभेचे 29 मतदारसंघ आहेत. यातील 21 जागांवर भाजपाला विजय मिळेल, असा अंदाज आहे. काँग्रेस, भाजपानं अद्याप सर्व जागांवरील उमेदवारदेखील जाहीर केलेले नाहीत. मात्र सट्टा बाजारानं भाजपाच्या बाजूनं कौल दिला आहे. मात्र सट्टा बाजारानं भाजपाच्या बाजूनं कौल दिला आहे. भाजपाला काँग्रेसपेक्षा तिप्पट जागा मिळतील, असा अंदाज बुकींनी वर्तवला आहे. 'एखाद्या व्यक्तीनं भाजपावर सट्टा लावला आणि भाजपाला 246 पेक्षा कमी जागा मिळाल्या, तर त्याला दुप्पट रक्कम मिळेल. मात्र भाजपाला 246 पेक्षा अधिक जागा मिळाल्यास त्या व्यक्तीला एकही पैसा मिळणार नाही,' असं एका बुकीनं सांगितलं.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMadhya Pradeshमध्य प्रदेशNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेस