शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

भारतीय संविधानावरच घालायचा आहे भाजपला घाला- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2019 05:43 IST

अशोक चव्हाण यांचे भाजपचा दहशतवाद संपवण्याचे आवाहन

मीरा रोड : मोदी सरकारने देशाच्या न्यायपालिकेवर, सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर, रिझर्व्ह बँकेवर हल्ला केला आहे. आता त्यांचे संविधानावर हल्ला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हे सरकार देशाच्या हिताचे नाही. देशाच्या हितासाठी हे सरकार घालवणे आवश्यक आहे. देशासाठी जे बलिदान द्यावे लागेल, ते देण्याची तयारी ठेवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी केले. लोकसभा निवडणुकीत आपण सर्व विरोधी पक्षांनी जशी एकजूट दाखवली, तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कायम ठेवून देशापाठोपाठ राज्यातील भाजपा युतीची सत्ता संपवून टाकू, असा निर्धारही पवार यांनी केला.ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड येथे सावरकर चौकाजवळ मेडतिया मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी सोमवारी सायंकाळी पवार येथे आले होते. माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, अमर राजुरकर, माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार मुझफ्फर हुसेन आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, आरपीआय आदी पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.काळा पैसा बाहेर काढायचा म्हणून नोटाबंदी केली. काळा पैसा सामान्यांकडे नसतो तर मोठ्यांकडे असतो. पैसा काढला तो सामान्यांचा. मोदींना स्वीस बँकेतून अजून पैसा आणता आला नाही, असे पवार म्हणाले. जीएसटी आणून देशातील लहान व्यापाºयांना मोदींनी संकटात टाकले. ज्यांनी पाच वर्षांपूर्वी मोदींना पाठिंबा दिला, तेच दु:खी आहेत. तीच अवस्था उद्योग क्षेत्राची आहे. काँग्रेस शासनाने उद्योग वाढवण्याचे काम केल्याने राज्य पहिल्या क्रमांकावर असायचे. पण, आज स्थिती वाईट आहे. सरकारच्या धोरणांमध्ये दोष आहे. आज मुंबई-ठाण्यातील उद्योग संपले. शेतीसोबत उद्योग वाढवले नाहीत. त्याचा सर्वात मोठा फटका तरुणांच्या रोजगाराला बसला, याकडे पवार यांनी लक्ष वेधले.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, देशातील भाजपचा दहशतवाद रोखण्याकरिता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. लोकांनी काय खायचे, काय बोलायचे हे सरकारच ठरवत आहे. याच्या विरोधात बोलले तर देशद्रोहाचे गुन्हे दाखल केले जातात. चौकशीचा ससेमिरा पाठीमागे लावला जातो. भाजपच्या दहशतवादापासून देश मुक्त करणे गरजेचे आहे.‘शेतकºयांंसाठी ठोस धोरण नाही’पवार म्हणाले की, देशात गेल्या दोन वर्षांत ११ हजार ९९० शेतकºयांनी आत्महत्या केल्या. शेतमालाला रास्त भाव नाही. शेतकºयांच्या हक्कांचे रक्षण करणे, ही काँग्रेसची नीती होती. काँग्रेस शासन काळात शेतकºयांचे ७० हजार कोटींचे कर्ज माफ केले होते. आज शेतकरी त्रासले आहेत. राज्यात दुष्काळ पडला आहे. शेतकºयांसाठी भाजपचे कोणतेही ठोस धोरण नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Sharad Pawarशरद पवारBJPभाजपा