शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच पक्षाचे दोन नेते भेटतात तेव्हा...; 'नाराज' पंकजा मुंडेंची चंद्रकांत पाटलांनी घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2021 23:13 IST

Pankaja munde: विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून डावलल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावरील पद देण्यात आले होते. यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंचे नाव चर्चेत असतानाही वगळल्याने बीड जिल्ह्यातील 80 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती.

विधानसभा निवडणुकीपासून भाजपावर नाराज असलेल्या पंकजा मुंडे (Pankaja munde) यांची राज्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी भेट घेतली. यावेळी त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्याने यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Chandrakant Patil met Pankaja munde.)

विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून डावलल्यामुळे नाराज असलेल्या पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय स्तरावरील पद देण्यात आले होते. यानंतर मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडेंचे नाव चर्चेत असतानाही वगळल्याने बीड जिल्ह्यातील 80 हून अधिक पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे राजीनामे देत पंकजा मुंडेंची मुंबईत भेट घेतली होती. यावेळी पंकजा यांनी राजीनामे फेटाळत असल्याचे सांगत राज्यातील नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच मोदी, शहा, नड्डा हे माझे नेते आहेत, असे म्हटले होते. 

भाजपाने बोलावलेल्या ओबीसी आरक्षणाच्या बैठकीतही पंकजा यांनी पाठ फिरविली होती. या घडामोडींवर आज भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांची गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या कार्यालयात भेट घेतली. मंगळवारी सायंकाळी ही भेट झाली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यावर चंद्रकांत पाटलांनी एकाच पक्षातील दोन नेते भेटले तर त्यात वेगळे काय असा सवाल करत ही गुप्त भेट नव्हती, तर सर्वांसमोर झाल्याचे ते म्हणाले. 

 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेchandrakant patilचंद्रकांत पाटील