शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

"ममतांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिलं नाही; म्हणाल्या, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती", भाजपाचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2021 18:00 IST

PM Modi Meeting on Corona Situation: ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिले नाही', असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला

ठळक मुद्देममता बॅनर्जींच्या या आरोपाला आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)  यांनी गुरुवारी विविध राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांशी कोरोनासंदर्भात ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्या-त्या राज्यांचे मुख्यमंत्रीही या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Mamata Banerjee) हजर होत्या. या बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'ना लस, ना धोरण, आम्हाला बोलूच दिले नाही', असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. ममता बॅनर्जींच्या या आरोपाला आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलूच दिले नाही, असा आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला आहे.  (bjp retaliated on mamta ravi shankar prasad says mamata conduct shameful)

"आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधात चांगल्या कामांची माहिती शेअर करण्यासाठी काही राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे आचरण आज अत्यंत अशोभनीय होते. त्यांनी संपूर्ण बैठकीला एक प्रकारे पटरीवरुन उतरवण्याचे काम केले", असे रविशंकर प्रसाद म्हणाले. 

याचबरोबर, "ममता बॅनर्जींनी आरोप केला की फक्त भाजपाशासित राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांनाच बोलावले जाते. पण, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीत आंध्र प्रदेश, केरळ, छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील जिल्हाधिकाऱ्यांनीही आपले मत मांडले. ममता बॅनर्जी यांनी 24-परगनाच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलू दिले नाही. त्या म्हणाल्या की जिल्हाधिकाऱ्यांना काय माहिती, त्यांच्यापेक्षा जास्त मला माहिती आहे", असे सांगत रविशंकर प्रसाद यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे.

'आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही'मोदींसोबतच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगनंतर ममता बॅनर्जी यांनी एक पत्रकार परिषद घेऊन मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. "भाजपाचे काही मुख्यमंत्री आणि पंतप्रधान मोदी यांनी आपआपले मुद्दे मांडले. मात्र आम्हाला बोलण्याची संधी मिळाली नाही. सर्व मुख्यमंत्री केवळ गप्प बसून होते. कोणीही काहीही बोलले नाही. आम्हाला कोरोना लसीची मागणी करायची होती, मात्र बोलूच दिले नाही" असा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.  

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीRavi Shankar Prasadरविशंकर प्रसादNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाwest bengalपश्चिम बंगाल