शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

आपली ५० टक्केही मतं राखू न शकणाऱ्या महाविकास आघाडीचे भविष्य काय?; भाजपचा हल्लाबोल

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 16:11 IST

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते.

मुंबईविधान परिषदेच्या धुळे-नंदुरबार स्थानिक संस्था निवडणुकीत भाजपचे अमरिश पटेल यांचा विजय झाला. महाविकास आघाडीची याठिकाणी ११५ मतं फुटल्याचं समोर आलं. महाविकास आघाडीच्या या पराभवावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी जोरदार टीका केली आहे. 

"धुळे नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात महाविकास आघाडी आपली ५० टक्केही मत राखू शकली नाहीत. यावरुन उद्याचे महाविकास आघाडीचे भविष्य काय राहील हे स्पष्ट होते", असं ट्विट प्रवीण दरेकर यांनी केलं आहे. यासोबत त्यांनी भाजपचे विजयी उमेदवार अमरिश पटेल यांचे अभिनंदन देखील केले. 

अमरिश पटेल हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले उमेदवार होते. तर  अभिजीत पाटील भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले उमेदवार होते. निवडणुकीत भाजपकडे १९९ तर महाविकास आघाडीच्या २१३ सदस्यांनी मतदान केले होते. तरीही भाजपचे उमेदवार अमरिश पटेल यांनी महाविकास आघाडीला मात दिली आहे. अभिजीत पाटील यांना केवळ ९८ मतं पडली. त्यामुळे क्रॉसवोटिंग झाल्याने निष्पन्न झाले आहे. 

महाविकास आघाडीच्या याच पराभवाचा धागा पकडून भाजपकडून जोरदार हल्ला केला जात आहे. धुळे-नंदुरबार प्रमाणेच इतर मतदार संघातही भाजपचाच उमेदवार विजयी होईल असा विश्वास भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. धुळे-नंदुरबारच्या निकालावरुन आता महाविकास आघाडीच्या ऐक्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

टॅग्स :pravin darekarप्रवीण दरेकरBJPभाजपाShiv SenaशिवसेनाAmrishbhai Patelअमरीशभाई पटेल