शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

Mumbai Rain: "आता ठाकरे सरकार मुंबईतील पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल", भाजपाचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2021 16:50 IST

Mumbai rain Politics: पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

मुंबई - आज पावसाने मुंबई आणि आसपासच्या परिसराला झोडपून काढले आहे. अनेक सखल भागात पाणी साठल्याने रस्ते वाहतूक तसेच रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक ठिकाणी घरांमध्येही पाणी शिरले आहे. दरम्यान, पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर आता राजकारणालाही जोर आला आहे. पहिल्याच पावसात मुंबईत साठलेल्या पाण्यावरून विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे. तसेच आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल, असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे. 

मुंबईत मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून राज्य सरकारवर टीका करताना अतुल भातखळकर म्हणाले की, मुंबई महानगरपालिकेने आज मुंबई तुंबवून दाखवली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. ती बाब आता आज उघड झाली आहे. आता राज्य सरकारकडून पावसाची जबाबदारीही आता बहुतेक मोदींवर ढकलली जाईल. आता मोदींनीच त्यातून मार्ग काढावा, असे राज्य सरकारने म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला. आज सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे मुंबईसह आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाजवळ पाणी साठल्याने उपनगरीय वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच अंधेरीसह, हिंदमाता परिसरातही पाणी साठल्यामुळे रस्ते वाहतूक बाधित झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेत आहेत. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.  अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन परवाच मुख्यमंत्र्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक घेऊन सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे निर्देश दिले होते त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी सकाळी संबंधित विभागाकडून माहिती घेतली व मुंबई तसेच किनारपट्टीवरील जिल्ह्यातील नागरिकांना असुविधा होणार नाही यासाठी प्रशासनाने तातडीने पाऊले उचलावीत व जेथे

टॅग्स :Mumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटAtul Bhatkalkarअतुल भातखळकरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMumbai Municipal Corporationमुंबई महानगरपालिकाNarendra Modiनरेंद्र मोदी