शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"देशाचा जीडीपी नव्हे, पंतप्रधान मोदींचं काम पाहा; त्यांनी बलाढ्य चीनलाही नमवलंय"

By कुणाल गवाणकर | Updated: September 22, 2020 15:55 IST

जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्यातल्या जनतेला कोणती मदत केली?

अहमदनगर: देशाचा जीडीपी खाली आला की वर गेला याचा विचार करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेसाठी अहोरात्र केलेल्या कामाचा विचार करायला हवा. त्यांनी चीनसारख्या बलाढ्य देशालाही नमवलं आहे, अशा शब्दांत भाजपचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलं. जीडीपी खाली आला म्हणून आरडाओरड करणाऱ्यांनी गेल्या सहा महिन्यांत राज्यातल्या जनतेला कोणती मदत केली, असा सवाल करत पाटील यांनी विरोधकांना केला."मोदीजींचा हेतू 'स्वच्छ', कृषीविरोधी नवा प्रयत्न; शेतकऱ्यांना समूळ नष्ट करून भांडवलदारांचा मोठा विकास"पंतप्रधान मोदींच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भाजपकडून देशभरात सेवा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. सेवा सप्ताहाच्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिर्डी विधानसभा मतदारसंघातल्या आशा सेविकांना विखे-पाटील यांच्या सहकार्यानं विमा पॉलिसींचं वितरण करण्यात आलं. यावेळी विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत पंतप्रधानांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. 'कोरोना काळात ज्‍यांच्‍यावर जबाबदारी होती, तेच घरात बसल्‍यामुळे सामान्‍य माणसाच्‍या हितासाठी कोणतंही काम राज्‍यात झालं नाही. याउलट पंतप्रधान मोदींनी संकटाच्‍या काळात सामान्‍य माणसाला दिलासा देण्‍यासाठी निर्णय प्रक्रिया राबवली. २० लाख कोटी रुपयांचं आत्‍मनिर्भर भारत पॅकेज जाहीर करुन उद्योजकांपासून ते पथविक्रेत्‍यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून महिलांपर्यंत सर्वांना योजना देऊन हा देश पुन्‍हा आत्‍मविश्‍वासाने पुढे नेण्याचा यशस्‍वी प्रयत्‍न केला,' अशा शब्दांत विखे-पाटील यांनी मोदींवर स्तुतीसुमनं उधळली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस, निवडणुकांतील प्रतिज्ञापत्रांवर प्रश्नचिन्हदेशाचा विकास दर (जीडीपी) खाली आला म्‍हणून मोदींच्‍या नावाने ओरडणाऱ्यांनी मागील सहा महिन्‍यांत राज्‍यातील जनतेला कोणता दिलासा दिला? याबद्दल आत्‍मपरीक्षण करावं, असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला. मोदींच्‍या निर्णयक्षमतेमुळे हा देश संकटातून वाचला. त्यामुळेच शिर्डी विधानसभा मतदारसंघात त्‍यांचा वाढदिवस आशा सेविकांसाठी समर्पित करण्‍याचा निर्णय घेतला. आशा सेविकांना विमा पॉलिसीचं संरक्षण देण्‍याचा राज्यातील पहिला उपक्रम या निमित्ताने संपन्ना झाला,' असंही विखे पाटील म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटीलBJPभाजपा