शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
3
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
4
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
5
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
6
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
7
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
8
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
9
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
10
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
12
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
13
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
14
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
15
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
16
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
17
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
18
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
19
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
20
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली

“एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण करतोच”; भाजपा नेत्याचा शिवसेना अन् राष्ट्रवादीला इशारा

By प्रविण मरगळे | Published: February 10, 2021 11:55 AM

BJP Ganesh Naik Target Shiv Sena & NCP: अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला.

ठळक मुद्देआतापर्यंत १४ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आम्हाला काही फरक पडत नाहीआमचे जितके नगरसेवक फोडाल त्यापेक्षा दुपटीने तुमचे फोडूनवी मुंबईत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे.

नवी मुंबई – आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारणाला वेग आला आहे. आतापर्यंत भाजपाच्या १४ नगरसेवकांनी पक्षाची साथ सोडत शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रवेश घेतला आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपा नेते गणेश नाईक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे, त्यामुळे भाजपा विरुद्ध शिवसेना-राष्ट्रवादी हे राजकारण चांगलंच रंगल्याचं दिसून येत आहे.

याबाबत गणेश नाईक म्हणाले की, आतापर्यंत १४ नगरसेवकांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली. आम्हाला काही फरक पडत नाही, आमचे जितके नगरसेवक फोडाल त्यापेक्षा दुपटीने तुमचे फोडू, एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती पूर्ण करतोच असं सांगत नाईकांनी शिवसेना-राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.(Navi Mumbai Municipal Corporation Election Update News) 

शिवसेना नेत्यांचा एकला चलो रे नारा

नवी मुंबई महापालिकेत एकूण १११ नगरसेवकांचे संख्याबळ आहे. यातच जागावाटपात काँग्रेस-राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास शिवसेनेने नकार दिला आहे. नवी मुंबईतील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेतली, यात महाविकास आघाडीऐवजी स्वबळावर निवडणूक लढवावी अशी मागणी नेत्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये दुरावा असल्याचं पाहायला मिळत आहे.

नवी मुंबईत महापालिकेत पक्षीय बलाबल (एकूण १११)

भाजपा – ५६

शिवसेना – ३८

राष्ट्रवादी – २

काँग्रेस – १०

इतर – ५

नवी मुंबईत महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, गेल्या अनेक वर्षापासून नवी मुंबईत नाईक कुटुंबाचं वर्चस्व आहे. नाईक यांनी राष्ट्रवादीची साथ सोडत भाजपात प्रवेश घेतला होता, त्यानंतर महापालिकेतील राष्ट्रवादीची एकहाती सत्ता कोसळली, अनेक राष्ट्रवादी नगरसेवकांनी भाजपात प्रवेश केला होता, त्यामुळे भाजपाला नवी मुंबई महापालिकेवर झेंडा फडकवता आला. मात्र आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक गणेश नाईकांची साथ सोडून पुन्हा स्वगृही परतत असल्याचं दिसून येत आहे.

महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यासोबत मनसेनेही यंदा नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. गेल्या काही वर्षापासून मनसेने नवी मुंबईत पक्षीय बांधणी केली आहे, यंदा पहिल्यांदाच ही महापालिका निवडणूक लढवणार असल्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केली आहे, त्याच पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांच्या बैठका राज ठाकरेंनी घेतल्या होत्या, मागील विधानसभा निवडणुकीत मनसेला ५० हजारांपेक्षा जास्त मतदान शहरातील  २ मतदारसंघात झालं होतं, त्याचसोबत इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते मनसेत प्रवेश करत आहेत, त्यामुळे नवी मुंबई महापालिकेत यंदा तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईक