शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजा 'उधार' झाला अन् हाती भोपळा दिला; शेतकरी प्रश्नावरून फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Updated: December 25, 2020 14:33 IST

शेतकरी संवाद यात्रेदरम्यान देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारवर जोरदार टीका

पुणे: राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी प्रश्नावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. राज्यातील शेतकरी संकटात असताना राज्य सरकार कोणतीही मदत दिली नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मात्र प्रत्यक्षात राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं, अशी टीका फडणवीस यांनी केली. ते शेतकरी संवाद यात्रेदरम्यान पुण्यात बोलत होते.प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात मदत दिली जात आहे. मात्र राज्य सरकार पीक विमा कंपनीदेखील अपॉईंट करू शकलं नाही. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना विम्याचे पैसेच मिळाले नाहीत. राज्यात भाजपचं सरकार असताना चार वर्ष प्रधानमंत्री पीक विमा योजना व्यवस्थित राबवण्यात आली. त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. मात्र आता सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार शेतकऱ्यांना मूर्ख बनवण्याचं काम करत आहे, अशा शब्दांत फडणवीसांनी शरसंधान साधलं.अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांनी बांधावर जाऊन परिस्थितीचा आढावादेखील घेतला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार तर मुख्यमंत्र्यांच्याही पुढे गेले. त्यांनी बागायतदारांना दीड लाख रुपयांची मदत देऊ असं म्हटलं होतं. मात्र प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. राजा उधार झाला आणि हाती भोपळा दिला, अशी राज्यातील परिस्थिती आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.ठाकरे सरकारच्या कर्जमाफीवरदेखील फडणवीस यांनी जोरदार टीका केली. 'आम्ही केलेल्या कर्जमाफीला नाव ठेवत महाविकास आघाडी सरकारनं कर्जमाफीची योजना तयार केली. मात्र त्याचा फारसा उपयोग झाला नाही. आम्ही केलेल्या कर्जमाफीचा लाभ ४२ लाख शेतकऱ्यांना झाला होता. मात्र यांची कर्जमाफी २९ लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आम्ही प्रामाणिक शेतकऱ्यांना इन्सेंटिव्ह दिला होता. यांनी मात्र प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ठेंगा दाखवला,' अशा शब्दांत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारचा समाचार घेतला. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेAjit Pawarअजित पवार