शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीत नेमकी कोणती चर्चा?; भाजपचा ज्येष्ठ नेता म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:07 IST

दोघांमध्ये राजकीय गुफ्तगू झाल्याची जोरदार चर्चा

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या सिल्व्हर ओक बंगल्यावर भेट घेऊन २५ मिनिटे चर्चा केली. फडणवीस हे पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी गेले; पण यानिमित्ताने दोघांमध्ये राजकीय गुफ्तगू झाल्याची जोरदार चर्चा आहे.फडणवीस यांनी या भेटीबद्दल ट्विट करून, ही सदिच्छा भेट होती, असे स्पष्ट केले. या चर्चेच्या वेळी दोघेच उपस्थित होते. राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती, मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा, पदोन्नतीतील आरक्षण आदी विषयांवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. विविध संवेदनशील सामाजिक मुद्द्यांवर राज्य शासन अडचणीत आलेले दिसते. त्यावर मार्ग काढण्याबाबत फडणवीस यांनी काही सूचना केल्याचे कळते. दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याच्या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही; पण दोन बडे नेते एकत्र आल्यानंतर राजकीय चर्चा होणे साहजिक आहे, असे मत भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.आपण सध्या राज्यभर दौरे करत असल्याची माहिती फडणवीस यांनी पवार यांना दिली. आपण स्वत: विरोधी पक्षनेता असताना राज्य कसे पिंजून काढत होतो, याबाबत पवार यांनी या वेळी सांगितले. केळी पिकासंदर्भात पीक विम्याच्या अटी केळी उत्पादकांवर अन्याय करणाऱ्या आहेत. माजी खासदार हरीभाऊ जावळे समितीने यासंदर्भात केलेल्या शिफारशी राज्य शासनाने स्वीकाराव्यात, अशी सूचना फडणवीस यांनी या वेळी केली.मध्यंतरीच्या शस्त्रक्रियेनंतर शरद पवार हे पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. गेल्याच आठवड्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ४० मिनिटे चर्चा केली होती. आज फडणवीस त्यांच्या भेटीला गेले. पवार यांनी मंगळवारी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक बोलाविली आहे.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा