शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

"११ लोकांचा मृत्यू झाला तरीही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम अद्याप कायम"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 16:55 IST

BJP Leader Atul Bhatkhalkar : मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

ठळक मुद्देलोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील हे पाहण्यातच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मशगुल असल्याची टीका सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई - भांडुपच्या ड्रीम मॉलमधील सनराइज हॉस्पिटलला लागलेल्या आगीमुळे ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाल्यानंतरही सत्ताधारी शिवसेनेचे सनराइज हॉस्पिटलवरील प्रेम कमी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये लागलेल्या आगीप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून तीन दिवस उलटून गेलेले असताना सुद्धा अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही किंवा साधे चौकशीसाठी सुद्धा ताब्यात घेण्यात आलेले नाही. इतकेच नव्हे तर कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन मुंबईतील खाजगी रुग्णालयांमधील खाटा अधिग्रहित करण्याच्या यादीत पूर्णपणे जळालेल्या अवस्थेतील व ३१ मार्च रोजी परवाना संपणाऱ्या सनराइज हॉस्पिटलचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे, यातून शिवसेनेच्या वरदहस्तामुळेच सनराइज हॉस्पिटल सुरू होते हे सिद्ध होते, असा आरोप मुंबई भाजपा प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. (BJP Leader Atul Bhatkhalkar said, "Even though 11 people died, the ruling Shiv Sena's love for Sunrise Hospital still remains")

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनायोद्धे व महापालिकेतील कर्मचारी यांना उपचार घेता यावा या सबबीखाली सनराइज हॉस्पिटलला मान्यता देण्यात आली. या मान्यतेच्या प्रक्रियेसाठी महापालिकेचे अधिकारी, सनराइज हॉस्पिटलचे संचालक यांचा 'रिव्हायवल सनराइज हॉस्पिटल' या नावाने व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आला,  दि,25 एप्रिल 2020 रोजी दिलेल्या अर्जावर अर्थपूर्ण संवादातून केवळ दहा दिवसात नाममात्र प्रक्रिया करून 6 मे 2020 ला परवानगी देण्यात आली. असे करताना मॉलमध्ये व हॉस्पिटलमध्ये अग्निशमन यंत्रणा पुरेसी नसल्याची माहिती असून सुद्धा त्याकडे कानाडोळा करण्यात आला, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

मुंबईत मागील दहा वर्षात झालेल्या अनेक आगीच्या घटना घडल्या. कमला मिल येथील दुर्घटना असो किंवा मागच्या वर्षी सिटी सेंट्रल मॉलला लागलेली आग असो किंवा त्या अगोदरच्या अनेक घटनांमध्ये बेकायदेशीर रित्या बांधकाम करण्यात आलेले होते किंवा अग्निशमन यंत्रणेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलेले होते, हे समोर आलेले असताना सुद्धा 'टक्केवारीपूर्ण' काम करणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेने त्याकडे कानाडोळा करण्याचे काम केले, असा आरोप सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केला.

मुंबई सर्वांत सुरक्षित शहर असल्याचे म्हणून स्वतःची पाट थोपटून घेणाऱ्या मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 2008 ते 2019 या 11 वर्षांत आगीच्या 58,587 घटना घडल्या असून त्यात तब्बल 704 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, यात 5 अग्निशमन अधिकाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. इतकी भयावह अवस्था असताना सुद्धा आजही मुंबईत तेराशे पेक्षा जास्त अनधिकृत रुग्णालये सुरु असून व 29 मॉलमध्ये अग्निशमन यंत्रणा कुचकामी असल्याचे महानगरपालिकेच्या आकडेवारी वरून समोर आले असताना सुद्धा, त्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. लोकांचा जीव गेला तरी चालेल परंतु टक्केवारीतून आपले खिसे कसे भरतील हे पाहण्यातच महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना मशगुल असल्याची टीका सुद्धा आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

टॅग्स :Atul Bhatkalkarअतुल भातखळकरShiv SenaशिवसेनाBJPभाजपाMumbaiमुंबईhospitalहॉस्पिटलPoliticsराजकारण