शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Protest: भाजपाने राज्यसभा खासदारांना बजावला व्हीप; सोमवारचा दिवस मोदींसाठी महत्वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:35 IST

Farmer Protest affected Budget Session: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे.

शेतकरी आंदोलनावरून आता संसदेत गदारोळ सुरु आहे. कृषी विधेयकांवर लोकसभेत आणि राज्यसभेत चर्चा न करताच विधेयके संमत करण्यात आल्याचा आरोप विरोधक करत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांना दिल्ला वेढा घातलेला असतानाआता विरोधकही केंद्र सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे 8 फेब्रुवारी, सोमवारी भाजपाने सर्व खासदारांना राज्यसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावला आहे. (BJP issue Whip to Rajyasabha MP for Monday)

राज्यसभेमध्ये आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा संपली. लोकसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चा होऊ शकली नाही. प्रश्नोत्तर काळात आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी विचारलेल्या प्रश्नांवर उत्तरे दिली. कामकाज वारंवार तहकूब होत होते. सायंकाळी 4 आणि पुन्हा 6 वाजता कामकाज सुरु करण्यात आले. शेतकरी आंदोलनावरून विरोधकांनी गोंधळ घातल्याने कामकाज सुरळीत होऊ शकले नाही. यामुळे लोकसभेचे कामकाज सोमवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत होणारा विरोध पाहून वरिष्ठ मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला गृह मंत्री अमित शहा हजर होते. तसेच केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रल्हाद जोशी हजर होते. या बैठकीनंतर भाजपाच्या राज्यसभेतील खासदारांना व्हीप बजावण्यात आला आहे. यामध्ये सोमवारी कोणत्याही परिस्थितीत खासदारांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पंतप्रधान  नरेंद्र मोदी राज्यसभेत सोमवारी शेतकरी आंदोलन, कृषी कायद्यांवर आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे. 

तोमर काय म्हणाले...

नव्या कृषी कायद्यांना विरोध फक्त एका राज्यापुरता मर्यादित आहे. शेतकऱ्यांना भडकवले जात आहे. शेतकरी संघटना आणि विरोधी पक्षांना नव्या कृषी कायद्यांमधील एक त्रृटी दाखवण्यास अपयश आले आहे, असे नरेंद्रसिंह तोमर म्हणाले. तसेच, शेतकरी आंदोलनाबाबत कांग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना संपूर्ण जगाला माहिती आहे की, पाण्यानेच शेती होते. रक्ताने शेती फक्त काँग्रेसच करू शकते. भाजपा रक्ताने शेती करू शकत नाही, असे सांगत नरेंद्रसिंह तोमर यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

टॅग्स :BJPभाजपाRajya Sabhaराज्यसभाFarmers Protestशेतकरी आंदोलनcongressकाँग्रेस