शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

VIDEO: 'भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही; पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो'

By कुणाल गवाणकर | Updated: December 26, 2020 09:49 IST

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा

जयपूर: भारतीय जनता पक्ष आणि मोदी सरकारवर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोरदार टीका केली आहे. भाजप मुस्लिमांना निवडणुकीत उमेदवारी देत नाही. मात्र सरकारं पाडण्यासाठी त्यांचा वापर करते, अशा शब्दांत गेहलोत यांनी मोदी सरकारला लक्ष्य केलं. भाजपचे नेते जफर इस्लाम गेहलोत यांच्या निशाण्यावर होते. इस्लाम यांनी राजस्थानातील काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची मुस्लिमांबद्दलची भूमिका दुटप्पी असल्याची टीका गेहलोत यांनी केली. 'भाजपनं राज्यातलं काँग्रेस सरकार पाडण्याचा प्रयत्न केला. या कटात भाजप नेते जफर इस्लाम यांचा समावेश होता. भाजप निवडणुकीत मुस्लिमांना तिकीट देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो,' असा आरोप गेहलोत यांनी केला.उत्तर प्रदेशात ४०० अधिक विधानसभा मतदारसंघ आहेत. बिहारमध्ये २५० च्या आसपास मतदारसंघ आहेत. मात्र भाजप एकाही मुस्लिम व्यक्तीला तिकीट देत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल अलिगढ मुस्लिम विद्यापीठात किती छान भाषण दिलं. पंतप्रधानांचं व्यक्तीमत्त्व किती उदारमतवादी आहे, ते किती मोठ्या मनाचे आहेत. पण बोलण्यात आणि प्रत्यक्ष कृतीत किती फरक आहे. निवडणुकीत भाजप मुस्लिम व्यक्तींना उमेदवारी देत नाही. पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर नक्की करतो, अशा शब्दांत गेहलोत यांनी भाजपवर शरसंधान साधलं.मोदी सरकारनं आणलेले नवे कृषी कायदे आणि त्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेलं हजारो शेतकऱ्यांचं आंदोलन यावरूनही गेहलोत यांनी टीकास्त्र सोडलं. 'शेतकरी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहेत. सध्या हिवाळा सुरू आहे. आपल्याला इथे जयपूरमध्ये घरातही थंडी जाणवते आणि तिथे हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर आंदोलन करत आहेत. मात्र त्यांच्याकडे केंद्र सरकारचं लक्ष नाही. कोणत्याही व्यक्तीनं इतकं असंवेदनशील असू नये,' असं गेहलोत म्हणाले.

टॅग्स :Ashok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी