शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

'प्राप्तिकर खात्यातर्फे धाडी घालून भाजप विजय रोखू शकत नाही'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 04:17 IST

प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे.

तुतुकोडी : प्राप्तिकर खात्यामार्फत धाडी टाकून दडपण आणण्याचा भाजपने कितीही प्रयत्न केला तरी या पक्षाला लोकसभा निवडणुकीतील माझा विजय रोखता येणार नाही, असे द्रमुकच्या ज्येष्ठ नेत्या कणिमोळी यांनी म्हटले आहे. त्यांच्या निवासस्थानी मंगळवारी घातलेल्या छाप्यात प्राप्तिकर खात्याला काहीच सापडले नाही.कणिमोळी तामिळनाडूतील तुतुकोडीमधून निवडणूक लढत आहेत. त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर रोकड असल्याची माहिती मिळाल्यामुळे प्राप्तीकर खात्याने मंगळवारी संध्याकाळी तिथे धाड टाकली होती. मात्र त्यांच्याकडे काहीच सापडले नाही. आम्हाला मिळालेली माहिती चुकीची होती, असे या अधिकाऱ्यांनी बुधवारी मान्य केले.त्यानंतर कणिमोळी म्हणाल्या की, कुटील हेतू बाळगून टाकण्यात आलेली ही धाड लोकशाहीविरोधीही होती. तुतुकोडीमध्ये उद्या, गुरुवारी मतदान होणार असून त्याच्या आधी धाड घातल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. धाडीच्या वेळी कणिमोळी घरीच होत्या. कारवाई सुरू असताना त्यांच्या निवासस्थानाबाहेर द्रमुकचे कार्यकर्त्यांनी मोदीविरोधी घोषणा देत होते.द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांनी म्हणाले, निवडणुकांत पराभूत होण्याच्या भीतीने भाजपने विरोधी पक्षांच्या नेत्यांना त्रास देण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर चालविला आहे. प्राप्तीकर खात्याने गेल्या आठवड्यात चेन्नई, नमक्कल, तिरुनेलवेली यासह १८ ठिकाणी विरोधी पक्षांतील नेत्यांशी संबंधित ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या.>पक्षपाती कारवाई : चिदम्बरमकणिमोळी तसेच अन्य विरोधी नेत्यांच्या निवासस्थाने, कार्यालयांवर प्राप्तीकर खात्याने टाकलेले छापे ही पक्षपाती कारवाई होती अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली आहे. ते म्हणाले की, फक्त विरोधी पक्षांतील नेत्यांच्या व्यवहारांबाबतच प्राप्तिकर खात्याला खास माहिती मिळाली, हीच गोष्टच मुळात संशयास्पद आहे.

टॅग्स :Tamil Nadu Lok Sabha Election 2019तमिळनाडू लोकसभा निवडणूक 2019