शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
4
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
5
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
6
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
7
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
8
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
9
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
10
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
11
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
12
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
13
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
14
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
15
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
16
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
17
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
18
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
19
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
20
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?

Pune Graduate Constituency: पुणे पदवीधर निवडणुकीत मित्रपक्षाने साथ सोडली; भाजपाची डोकेदुखी वाढली

By प्रविण मरगळे | Updated: November 12, 2020 15:02 IST

Pune Graduate Constituency, BJP, Sadabhau Khot News: रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देरयत क्रांती संघटनेच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने भाजपा सदाभाऊ खोत यांची समजूत काढणार का?महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य प्रा. एन.डी चौगुले यांना उमेदवारीपुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते

पुणे – विधान परिषदेच्या ५ जागांसाठी येत्या १ डिसेंबरला निवडणूक होणार आहे, या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा थेट सामना रंगणार आहे. पुणे पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेने या निवडणुकीत वेगळी चूल मांडण्याचा निर्णय घेतला आहे.

रयत क्रांती संघटनेकडून पुणे पदवीधर निवडणुकीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी प्रा. एन. डी चौगुले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे भाजपा उमेदवार संग्राम देशमुख यांची डोकेदुखी वाढणार आहे. त्यातच राष्ट्रवादीकडून अरूण लाड यांना अधिकृत उमेदवारी घोषित झालेली आहे. मात्र राष्ट्रवादीच्या भैय्या माने यांनीही निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यामुळे भैय्या माने अर्ज मागे घेणार की राष्ट्रवादीला पुन्हा बंडखोरीचा फटका बसणार हे आगामी काळात ठरेल, तुर्तास सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेच्या उमेदवाराने अर्ज भरल्याने भाजपा खोत यांची समजूत काढणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोण आहेत प्रा. एन. डी. चौगुले?

प्रा. एन.डी चौगुले हे कोल्हापूर आणि सोलापूर या दोन जिल्ह्यात विस्तारलेल्या सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ माळवाडी कोतोली ता पन्हाळा या संस्थेचे अध्यक्ष असून महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कार्यकारी परिषद सदस्य म्हणून काम करत आहेत. महाविद्यालयीन शिक्षणाच्या काळात ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडे आकर्षित झाले. परिषदेच्या माध्यमातून त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरपूर काम केले . अनेक वादविवाद स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धा गाजविल्या . पुढे इंग्रजी विषयातून एम ए बीएड या पदव्या संपादन केल्या  आणि ते शिक्षक बनले. शिक्षण क्षेत्रातील उमेदवारीच्या काळामध्ये त्यांनी अनेक विनाअनुदानित शिक्षण संस्थांमध्ये शिक्षक म्हणून इमानेइतबारे नोकरी केली. एक शिक्षक ते संस्थाचालक असा त्यांचा प्रवास राहिला आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघातून गेल्यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील निवडून आले होते, पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र तेव्हाच्या निवडणुकीत सांगलीच्या अरूण लाड यांनी बंडखोरी करत अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यानिवडणुकीत चंद्रकांत पाटील यांना ६२ हजारांच्या आसपास मतदान झाले होते, तर सारंग पाटील यांना ५९ हजारांच्या वर मतदान झाले, अवघ्या २ हजारांच्या फरकाने भाजपाने ही जागा राखली होती, यात विशेषत: अरूण लाड यांनी घेतलेली २५ हजारांहून अधिक मते लक्षणीय होती, त्यामुळे लाड यांच्या बंडखोरीचा फटका बसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुणे पदवीधर मतदारसंघात निसटता पराभव सहन करावा लागला होता.

टॅग्स :PuneपुणेVidhan Parishad Electionविधान परिषद निवडणूकBJPभाजपाSadabhau Khotसदाभाउ खोत