शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

बिहार एनडीएमध्ये खदखद, जेडीयूनंतर अजून एका मित्रपक्षाने भाजपावर साधला निशाणा

By बाळकृष्ण परब | Updated: January 10, 2021 20:54 IST

Bihar Political News : निवडणुकीत एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले असले तरी सुरुवातीपासूनच हे सरकार अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर झोके घेत आहे

ठळक मुद्देजेडीयूनंतर हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम)चे नेते जीतनराम मांझी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहेमांझी यांनी भाजपाचे नाव न घेता टोले लगावले आणि कारस्थान करणारा पक्ष असा भाजपाचा उल्लेख केलानितीश कुमार यांच्याविरोधात निवडणुकीमध्ये कारस्थान रचले गेले

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता दोन महिने उलटले आहेत. या निवडणुकीत एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन केले असले तरी सुरुवातीपासूनच हे सरकार अस्थिरतेच्या हिंदोळ्यावर झोके घेत आहे. दरम्यान, जेडीयूच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक नेत्यांना पक्षाच्या खराब कामगिरीचे खापर भाजपाच्या माथी मारल्यानंतर आता एनडीएमधील अजून एक घटक पक्ष असलेल्या हिंदुस्थानी अवाम मोर्चा (हम)चे नेते जीतनराम मांझी यांनी भाजपाला लक्ष्य केले आहे.मांझी यांनी भाजपाचे नाव न घेता टोले लगावले आणि कारस्थान करणारा पक्ष असा भाजपाचा उल्लेख केला. भाजपाचे नाव न घेता मांझी म्हणाले की, नितीश कुमार यांच्याविरोधात निवडणुकीमध्ये कारस्थान रचले गेले. नितीश कुमार यांनी त्यांचे सरकार बिहारमध्ये पाच वर्षांची कारकीर्द पूर्ण करेल, असे ट्विट केले होते. त्यानंतर मांझी यांनी नितीश कुमार यांचे ट्विटरवरून कौतुक केले. तसेच त्यांना आघाडीधर्म पाळणे चांगल्या पद्धतीने येते, असे सांगितले.

मांझी म्हणाले की, एनडीएमधील घटक पक्षाचा अंतर्विरोध आणि कारस्थानांनंतरही त्यांना सहकार्य करणे नितीश कुमार यांच्या महानतेला अधोरेखित करते. ते म्हणाले की, राजकारणामध्ये आघाडीधर्माचे पालन करणे जर शिकायचे असेल तर ते नितीश कुमार यांच्याकडून शिकता येईल.मांझी शेवटी लिहितात की, नितीश कुमार यांच्या धैर्याला मांझीचा सलाम. बिहार एनडीएमध्ये असंतोष खदखदत असल्याच्या पार्श्वभूमीवर जीतनराम मांझीसुद्धा चर्चेत होते. मांझी हे मंत्रिमंडळात एका जागेसह एमएलसीच्या एका जागेसाठी दबाव बनवत असल्याची चर्चा आहे.

टॅग्स :BiharबिहारBJPभाजपाHindustani Awam Morchaहिंदुस्थानी अवाम मोर्चाPoliticsराजकारण