शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

Bihar Election 2020: ...म्हणून मला नितीश यांच्या सरकारची गरज आहे; पंतप्रधान मोदींचं बिहारी जनतेला पत्र

By कुणाल गवाणकर | Updated: November 5, 2020 18:47 IST

Bihar Election 2020: बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपला; ७ तारखेला मतदान; १० तारखेला निकाल

नवी दिल्ली: बिहार विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. ७ नोव्हेंबरला राज्यात अखेरच्या टप्प्यातलं मतदान होईल. यानंतर १० नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिहारी जनतेला पत्र लिहिलं आहे. बिहारचा विकास कोणत्याही अडथळ्याशिवाय सुरू राहावा यासाठी राज्यात नितीश कुमार सरकारची आवश्यकता असल्याचं मोदींनी पत्रात लिहिलं आहे.राज्यात एनडीएचं सरकार आणा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी पत्राच्या माध्यमातून बिहारच्या जनतेला केलं आहे. 'कुशासनासाठी नव्हे,  सुशासनासाठी मतदान करायचं आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हाच आपला मंत्र आहे. बिहारमध्ये विकासाच्या मुद्द्यावर मतदान होतंय आणि मला नितीश कुमार यांच्या सरकारची गरज आहे,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे. मोदींनी बिहारी जनतेला लिहिलेल्या पत्रात भाजपच्या जाहीरनाम्याचा उल्लेख केला आहे. 'एनडीए सरकारकडे विकासाची दृष्टी आणि आराखडा आहे. उत्तम कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या पायाभूत सुविधा केवळ एनडीए सरकारच देऊ शकतं,' असा विश्वास मोदींनी बिहारच्या जनतेला दिला आहे. अराजकतेच्या वातावरणात नवनिर्माण होऊ शकत नाही, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला आहे. '२००५ पासून बिहारमधील वातावरण बदललं आणि नवनिर्माणाची प्रक्रिया सुरू झाली. राज्यासाठी सामाजिक आणि आर्थिक संपन्नता महत्त्वाची आहे. या दोन्ही गोष्टी एनडीए सरकारच देऊ शकतं,' असं मोदींनी पत्रात म्हटलं आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारBihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकBJPभाजपा