शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Election 2020 : बिहारमध्ये जागावाटप निश्चित; जेडीयू 122, तर भाजपा 121 जागांवर लढणार निवडणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2020 19:53 IST

भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल. (Bihar Election 2020, jdu, bjp)

पाटणा :बिहार विधानसभा निवडणुकीसाठी (Bihar Assembly Election) भाजपा आणि जनता दल यूनायटेड (JDU) यांची युती निश्चित झाली आहे. जेडीयू 122 तर भाजपा 121 जागांवर ही निवडणूक लढेल. जेडीयू आपल्या जागांतील काही जागा जीतनराम मांझी यांना देणार आहे. तर भाजपा आपल्या जागांतील काही जागा व्हीआयपी पार्टीला देईल. उद्या पाटणा येथे युती, जागा आणि उमेदवारांची घोषणा होईल. मांझी यांना पाच ते सात जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपा उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता आहे. भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या घरी सोमवारी उमेदवारांच्या निवडीसंदर्भात बैठक झाली. भाजपाचे वरिष्ठ नेते आज पाटणा येथे जात आहे. या दोन्ही पक्षांच्या जागांची सविस्तर घोषणा उद्या पाटणा येथे होईल. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून जीतनराम मांझी यांना, तर भाजपा आपल्या वाट्याला आलेल्या जागांमधून मुकेश साहनी यांच्या व्हीआयपी पार्टीला (VIP Party) जागा देतील. बीजेपी नेत्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयू आणि भाजपाची युती बळकट आहे. तसेच संपूर्ण शक्तीनूशी निवडणूक लढवली जाईल. भाजपाचे आजी मंत्री, आमदार अथवा त्यांच्या मुलांना तिकीट मिळण्याची शक्यता कमी आहे.

"बिहारमध्ये NDA 220 जागा जिंकणार" -गेल्या आठवड्यातच, बिहारमध्ये सत्ताधारी एनडीए 220 जागा जिंकून दणदणीत विजय मिळवेल, असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रवक्ते शाहनवाझ हुसेन यांनी केला आहे. एनडीए बिहारमधील निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवणार आहे आणि या निवडणुकीत एनडीएला 220 जागा मिळतील, असे शाहनवाझ हुसेन यांनी म्हटले आहे.

बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास  -बिहार विधानसभेसाठी आता निवडणुकीची घोषणा झालेली आहे. बिहारच्या जनतेचा नितीश कुमार आणि एनडीएवर विश्वास आहे. कोरोनाकाळात राज्य आणि केंद्र सरकारने जे काम केले आहे, ते लोकांना दिसत आहे, असेही शाहनवा हुसेन यांनी म्हटले आहे. 

शाहनवाझ हुसेन यांनी सांगितले की आम्ही गेल्या १५ वर्षांत जे काम केले आहे. त्या आधारावर मत मागत आहोत. आम्ही पाटण्यात एम्स बांधले. चार लाख शिक्षकांची नियुक्ती केली. नर्सिंग कॉलेज सुरू केले. आम्ही विकासाच्या मुद्द्यावरूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020BiharबिहारNitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा