शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

Bihar Election 2020:कोरोनामुळे बिहारची निवडणूक सर्वांत महागडी; सरकारी तिजोरीतून खर्च होणार 'इतके' कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2020 06:53 IST

२0१५ मध्ये खर्च झाले होते २७0 कोटी : सरकारी तिजोरीतून खर्च होणार ६२० कोटी रूपयांपेक्षा जास्त रक्कम

नितीन अग्रवाल नई दिल्ली : कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये होत असलेली विधानसभा निवडणूक गेल्या निवडणुकीवर झालेल्या खर्चापेक्षा दुप्पट खर्चाची असू शकते. निवडणुकीच्या एकूण अर्थसंकल्पाचा मोठा भाग फक्त कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठीच्या उपायांवर खर्च करावा लागेल. यावेळी ६२० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च होऊ शकतात असे निवडणूक खर्चाचा अंदाज असणाऱ्यांचे म्हणणे आहे.

निवडणूक आयोगाकडील दस्तावेजांनुसार बिहारमध्ये २०१५ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीवर राज्याचे २७० कोटी रूपये खर्च झाले होते. राज्याच्या तिजोरीतून होणारा हा खर्च यंदा १३० पट वाढेल असा अंदाज आहे. मतदानात गुंतलेल्या सहा लाख कर्मचाऱ्यांना कोरोनापासून सुरक्षित राखण्यासाठी पीपीई किट, मास्क, हातमोजे, सॅनिटायझर व इतर आवश्यक उपायांवर कराव्या लागणाºया खर्चामुळे ही वाढ झाली आहे.

मतदान केंद्रांबाहेर सॅनिटाईज बूथ असेल. मतदान खोलीत यायच्या आधी मतदाराला या बूथमधून यावे लागेल. सोशल डिस्टेंसिंगच्या नियमांमुळे मतदान कर्मचाºयांना व सुरक्षादलांच्या वाहतुकीवर होणारा खर्चही वाढलेला असेल. सोशल डिस्टेंसिंग नियमांमुळे यंदा जास्त संख्येत बस, ट्रक, एसयूव्ही व इतर वाहनांची गरज असेल.७२,७२७ राज्यात बूथसोशल डिस्टेंसिंगच्या पालनासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढली आहे. राज्यात ७२,७२७ बूथ आहेत. परंतु, एक हजारपेक्षा जास्त मतदार असतील तर अतिरिक्त बूथ बनवले जातील. 33,797 अतिरिक्त बूथस्चा खर्चही करावा लागेल. सामान्य परिस्थितीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन कोटी रूपयांचा खर्च होऊ शकतो. 243 विधानसभा मतदारसंघांत ४८६ कोटी रूपये खर्च होऊ शकतात. कोरनामुळे कराव्या लागणाºया अतिरिक्त व्यवस्थेमुळे १३० कोटी रूपये जास्त खर्च होऊ शकतात, असे जाणकारांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकcorona virusकोरोना वायरस बातम्या