बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

By बाळकृष्ण परब | Published: November 15, 2020 10:53 PM2020-11-15T22:53:01+5:302020-11-15T23:29:35+5:30

Bihar Assembly Election 2020 News : विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे.

In Bihar, Congress became a shackle for Mahagathbandhan, a senior RJD leader Shivanand Tiwari alleged | बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

बिहारमध्ये काँग्रेस महाआघाडीसाठी बेडी ठरली, आरजेडीच्या ज्येष्ठ नेत्याने केला आरोप

Next
ठळक मुद्देबिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीतराहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती

पाटणा - बिहार विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करूनही महाआघाडीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाआघाडीमधील घटक पक्षांमध्ये सध्या निराशेचे वातावरण आहेत. त्यातच आता बिहारमधील निवडणुकीत सुमार कामगिरी करणाऱ्या काँग्रेसवर आरजेडीने जोरदार टीका केली आहे. बिहारमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ही महाआघा़डीसाठी पायातील बेडी बनली अशी टीका आरजेडीचे ज्येष्ठ नेते शिवानंद तिवारी यांनी केली आहे.

शिवानंद तिवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, महाआघाडीसाठी काँग्रेस ही  बेडी बनली आहे. काँग्रेसने या निवडणुकीसाठी ७० उमेदवार उतरवले होते. मात्र या ७० उमेदवारांसाठी ७० सभा काँग्रेसला घेता आल्या नाहीत .राहुल गांधी प्रचारासाठी तीन दिवस आले. प्रियंका गांधी आल्याच नाहीत. ही बाब योग्य नव्हती.



शिवानंद तिवारी म्हणाले की, माझ्या मते ही बाब केवळ बिहारपुरती मर्यादित नाही. इतर राज्यांमध्ये सुद्धा अधिकाधिक जागांवर लढण्याचा काँग्रेसचा आग्रह असतो. मात्र अधिकाधिक जागा जिंकण्यात ते अपयशी ठरतात. आता काँग्रेसने त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.



यावेळी राहुल गांधी यांच्या एकंदरीत मानसिकतेवरही शिवानंद तिवारी यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, बिहार विधानसभेची निवडणूक ऐन रंगात आली असताना राहुल गांधी प्रियंका गांधी यांच्या सिमलामधील निवासस्थानी सहलीसाठी गेले होते. अशाप्रकारे पक्ष चालतो का? सध्या ज्या प्रकारे काँग्रेस चालवली जात आहे त्याचा फायदा भाजपाला होत आहे, असा आरोपही तिवारी यांनी केला.  



नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने १२५ जागा जिंकत विजय मिळवला. तर तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला ११० जागांवर समाधान मानावे लागले. आता महाआघाडीला आलेल्या अपयशामध्ये काँग्रेसची निराशाजनक कामगिरी ही महत्त्वाचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. या निवडणुकीत लढवलेल्या एकूण ७० जागांपैकी केवळ १९ जागांवरच काँग्रेसला विजय मिळवता आला होता.

Web Title: In Bihar, Congress became a shackle for Mahagathbandhan, a senior RJD leader Shivanand Tiwari alleged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.