शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Assembly Election 2020: शिवसेना बिहारमध्ये लढणार; पण 'ती' खास ओळख सोबत नसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2020 06:42 IST

Bihar Assembly Election 2020: शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.

मुंबई : शिवसेनेने बिहारमध्ये विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळणार नसल्याने निवडणूक आयोग ठरवेल त्या चिन्हावर त्यांना लढावे लागणार आहे.शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांनी सांगितले की, ५० जागा लढवाव्या अशी बिहारमधील कार्यकर्त्याची मागणी आहे. पण ३० ते ४० जागा लढवण्याचा आमचा विचार असून, दोन दिवसांत निर्णय होईल.बिहारमध्ये सत्तारुढ जदयुचे निवडणूक चिन्ह धनुष्य आहे. अन्य पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह दिले तर मतदारांचा गोंधळ होईल, असा आक्षेप जदयुने झारखंड मुक्ती मोर्चाबाबत घेतला होता. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा हा सत्तारुढ पक्ष असून त्याचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आहे. जदयुचा हा आक्षेप मान्य करीत आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह देण्यास मनाई केली. तोच आदेश शिवसेनेलाही लागू राहील.सध्या नाही एकही जागाबिहारमध्ये उमेदवार निश्चित करण्याची जबाबदारी खा.अनिल देसाई, खा.प्रियांका चतुर्वेदींवर आहे, असे सूत्रांनी सांगितले. २०१५ च्या निवडणुकीत सेनेने ८० जागा लढविल्या. एकही जागा जिंकली नव्हती. सेनेच्या सर्व उमेदवारांना मिळून २,११,१३१ मते मिळाली होती. पक्षाचे सात उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होते. राष्ट्रवादीच्या उमेदवारांना १,८५,४३७ मते मिळाली होती.

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूक 2020Shiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊत