शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

मनसेला मोठा धक्का! मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांचा शिवसेनेत प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2021 19:45 IST

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं.

ठळक मुद्देउत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती.मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारीआदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.

मुंबई – आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मनसेला पुन्हा एकदा शिवसेनेने जबर धक्का दिला आहे. मनसेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर(MNS Aditya Shirodkar) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या(CM Uddhav Thackeray) उपस्थितीत शिवबंधन हाती बांधलं आहे. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित होते. आदित्य शिरोडकर यांच्या अचानक पक्ष सोडण्याने मनसेला धक्का बसला आहे.

काही महिन्यांपूर्वीच मनसेनं संघटनात्मक मजबुतीला सुरूवात केली होती. प्रमुख महानगरातील कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी लोकसभा मतदारसंघनिहाय पथक तयार करण्यात आलं. यात एक मनसे नेता आणि सरचिटणीस असा समावेश करण्यात आला होता. यात मुंबईतल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील जबाबदारी आदित्य शिरोडकर यांच्यावर सोपवण्यात आली होती. तर मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये आदित्य शिरोडकर यांच्यावर उच्च शिक्षण विभागाची जबाबदारी देण्यात आली होती.

आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात झाला होता वाद

मागील वर्षी २३ जानेवारीला मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण आणि पक्षाचं पहिलं अधिवेशन मुंबईत पार पडलं होतं. त्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी मनसेने मुंबईतील राजगड कार्यालयात बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये बाळा नांदगावकर यांनी एका दिलेल्या मुलाखतीत पक्षाचे नेते, महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटना पक्षाच्या वाढीसाठी कमी पडलो असल्याचं वक्तव्य केलं होतं. बाळा नांदगावकरांच्या या विधानावरुनच आदित्य शिरोडकर आणि बाळा नांदगावकर यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडल्याने पक्षातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला होता.

टॅग्स :MNSमनसेAditya Thackreyआदित्य ठाकरेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना