शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

भाजपाचा मोठा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर?; खासदार शरद पवारांची महत्त्वाची बैठक सुरु

By प्रविण मरगळे | Published: September 23, 2020 1:11 PM

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपासोडून अन्य पक्षात जाण्याची तयारी सुरु झाली आहे.

ठळक मुद्देभाजपामधील मोठा नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्यास उत्सुक?शरद पवारांची राष्ट्रवादी कार्यालयात उत्तर महाराष्ट्रातील स्थानिक नेत्यांसोबत बैठक या नेत्याला पक्षात घेतल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरणं काय असतील याचा आढावा

मुंबई – राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या मुख्यालयात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक सुरु आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून उत्तर महाराष्ट्रातील हा नेता भाजपात नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे भाजपासोडून अन्य पक्षात जाण्याची तयारी सुरु झाली आहे. मात्र या नेत्याला पक्षात घेतल्यास त्याचा कितपत फायदा राष्ट्रवादीला होऊ शकतो याची चाचपणी शरद पवार घेत आहेत. यात राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील यांच्यासोबत आढावा घेण्यात येत आहे. भाजपातून या नेत्याला राष्ट्रवादीत घेण्याबाबत स्थानिक नेत्यांची मते जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी बैठक बोलावली आहे.

याबाबत मराठी वृत्तवाहिन्यांनी केलेल्या दाव्यानुसार उत्तर महाराष्ट्रात भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे आक्रमकपणे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. फडणवीसांनीच माझं तिकीट कापलं, माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, आता मी यावर पुस्तक लिहिणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले होते.

त्यामुळे जर एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असतील तर जळगाव जिल्ह्यातील पक्षीय राजकारणात याचा काय परिणाम होऊ शकतो याबाबत शरद पवारांच्या बैठकीत खलबतं होणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वीही एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र ती केवळ चर्चा होती. त्यांनी भाजपातच राहणे पसंत केले, परंतु एकनाथ खडसेंनी आता पक्षातील विरोधकांविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने पुन्हा एकदा या चर्चेला उधाण आलं आहे.

खडसे प्रकरणात शिवसेना नेते गुलाबराव पाटील काय म्हणाले?

खडसेंच्या विषयावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथराव खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील युद्ध असेच चालते, पण पुन्हा बंद पडते. हे युद्ध कायम चालत राहिले पाहिजे. कोणतीही गोष्ट हातात घेतली म्हणजे ती धसास लावली पाहिजे. खडसे यांच्या रुपाने फडणवीस यांनी आमच्या उत्तर महाराष्ट्राचा एक ओबीसी नेता संपवला आहे. आता खडसेंनी पूर्ण युद्ध लढायला हवे. बोलायचे आणि पुन्हा बंद करायचे, हे माझ्या स्वभावात बसत नाही. खडसेंनी आता आरपारची लढाई लढली पाहिजे. खडसे बोलतील आणि शांत राहणार असतील तर त्यांच्या बोलण्याला महत्त्व राहणार नाही. युद्ध आणि कुस्ती कधीही अपूर्ण खेळायची नसते असंही गुलाबराव पाटील म्हणाले होते.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?

माझ्यावर केवळ आरोप झाले म्हणून मंत्रिपदाचा राजीनामा देण्यास सांगितलं. मग आरोप झालेल्या पक्षाच्या इतर मंत्र्यांना तो न्याय का लावला गेला नाही, असा सवाल भाजप नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंनी उपस्थित केला होता. पदाचा दुरुपयोग केल्याचा आरोप माझ्यावर ठेवण्यात आला. मग अ‍ॅक्सिस बँकेत पोलिसांचे पगार वळवले, तो काय पदाचा सदुपयोग होता का? असा प्रश्न खडसेंनी विचारला होता. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पोलिसांचे पगार अ‍ॅक्सिस बँकेत वळवण्याचा निर्णय घेतला. देवेंद्र यांच्या पत्नी अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेत काम करतात. त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप झाला होता. तोच मुद्दा खडसेंनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीसांना मी मोठं केलं, पण...

देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष कसे झाले, हेदेखील एकनाथ खडसेंनी सांगितलं होतं. 'मी देवेंद्र फडणवीस यांना २००५-२००६ पासून पाहतोय. ते अभ्यासू आणि होतकरू असल्यानं त्यांना मी संधी दिली. अनेकदा विधानसभेत माझ्या ऐवजी त्यांना पुढे केलं. पण आपण ज्यांच्यावर प्रेम केलं, ते पुढे जाऊन असे उतराई होतील असं वाटलं नव्हतं,' अशा शब्दांत खडसेंनी नाराजी व्यक्त केली. 'सुधीर मुनगंटीवार प्रदेशाध्यक्ष असताना चांगलं काम करत होते. मात्र त्यांचा कार्यकाळ संपत आला. त्यांनाच पुन्हा संधी दिली जावी, असं राज्य भाजपामधील अनेकांना वाटत होतं. त्यावेळी राजनाथ सिंह पक्षाचे अध्यक्ष होते. एकदा गोपीनाथ मुंडे माझ्याकडे आले. देवेंद्र यांना प्रदेशाध्यक्ष करण्याची शिफारस तुम्ही सिंह यांच्याकडे करा, असं मुंडे म्हणाले. गोपीनाथजी माझे नेते होते. मी त्यांचा सन्मान केला. राजनाथ यांना फोन करून मी देवेंद्र यांचं नाव सुचवलं आणि मग देवेंद्र प्रदेशाध्यक्ष झाले,' अशा शब्दांत खडसेंनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला.

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस