शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात जो मोठा, त्याच्याकडेच नेतृत्व, हेच महाआघाडीचे सूत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 03:39 IST

राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या प्रभावानुसार त्या-त्या ठिकाणी भाजपाविरोधी महाआघाडीचे नेतृत्व ठरेल.

- राजा मानेमुंबई : राज्या-राज्यातील प्रादेशिक पक्षांच्या प्रभावानुसार त्या-त्या ठिकाणी भाजपाविरोधी महाआघाडीचे नेतृत्व ठरेल. पश्चित बंगालमध्ये ममता बॅनर्जी, केरळमध्ये डीएमके, आंध्रप्रदेशमध्ये चंद्राबाबू नायडू, महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादी आणि हरियाणा व पंजाबमध्ये काँग्रेसकडे नेतृत्व असेल, असे राष्टÑवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या विशेष मुलखतीत सांगितले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना खा. पवार यांनी सध्याच्या राजकीय परस्थितीवर सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, २०१४ साली नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला स्वप्न दाखवून सत्ता संपादन केली; मात्र गेल्या साडेचार वर्षात जनतेचा स्वप्नभंग झाला आहे. शिवाय, त्यावेळी राहुल गांधी अगदीच नवखे होते. आता ते अधिक आक्रमक झाले असून राहुल यांची प्रतिमा पूर्णत: बदलली आहे. ते २०१४ चे राहुल गांधी राहिलेले नाही.काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील जागा वाटप अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. मात्र, औरंगाबाद, अहमदनगर, माढा, रावेर, उस्मानाबाद व जळगाव या लोकसभा मतदारसंघाचा निर्णय बाकी आहे. या जागांचा तिढा येत्या आठवडाभरात सुटेल, असे खा. पवार यांनी सांगितले.> वजन घटविण्याचा ‘शरद पवार फंडा’!मागच्या सहा महिन्यात शरद पवार यांनी आपले चौदा किलो वजन घटविले आहे. कसे घटविले त्यांनी आपले वजन? दीक्षित फंडा नव्हे... इथेही शरद पवार फंडाच! कॅन्सरसारख्या राक्षसाला आपल्यापुढे गुडघे टेकायला लावणारे पवार तसे ‘हाडाचे खवय्ये’ ! त्यात नॉन व्हेज हा तर त्यांच्या आवडीचा विषय. पण सहा महिन्यांपूर्वी त्यांनी वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. मनाचा ठाम निग्रह हे तर त्यांचे बलस्थानच. मग काय, त्यांनी आपला आवडीचा आणि जिव्हाळ्याचा नॉनव्हेज खाण्याचा विषय त्यांनी चुटकी सरशी बासनात गुंडाळला अन चक्क नॉनव्हेज सोडले! अर्थात वैद्यकीय कारणाने त्यांना मासे मात्र खावे लागतात. जेवणात केवळ एकच पोळी खाण्याचा नियमही त्यांनी केला. अशा आहाराला त्यांनी संधी मिळेल तेव्हा चालण्याची जोडही दिली. अवघ्या सहा महिन्यात त्यांचे १४ किलो वजन घटले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९