शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप, तर कार्यकारी अध्यक्ष चरणजितसिंग सप्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2020 05:35 IST

Bhai Jagtap as the President of Mumbai Congress : मुंबई अध्यक्षपदासाठी अमरजितसिंग मनहास, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती.

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या मुंबईकाँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक अर्जुनराव जगताप, उर्फ भाई जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्लीने त्यांच्या नावाला मंजुरी दिली आहे. कार्यकारी अध्यक्ष हे पददेखील तयार करण्यात आले असून, चरणजितसिंग सप्रा यांना या पदावर नेमले आहे.मुंबई अध्यक्षपदासाठी अमरजितसिंग मनहास, भाई जगताप, नसीम खान आणि सुरेश शेट्टी यांच्या नावांची चर्चा होती. या सगळ्यांना वेगवेगळ्या समित्यांवर समाविष्ट करून काँग्रेसने अंतर्गत वाद कमी होतील याचे प्रयत्न केले आहेत. प्रचार समितीच्या अध्यक्षपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची नियुक्ती केली आहे तर समन्वय समितीच्या अध्यक्षपदी अमरजितसिंग मनहास यांना नेमण्यात आले आहे. प्रचार आणि प्रसिद्धी समितीच्या अध्यक्षपदी माजी आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई काँग्रेसच्या प्रभारीपदी प्रदेश काँग्रेसचे चंद्रकांत हांडोरे यांना नेमण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका वर्षभरावर आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी मराठी चेहरा पक्षाने दिला आहे. त्यासोबत मुंबई काँग्रेसच्या कार्यकारी सदस्यपदी कॅम्पेनिंग कमिटी, समन्वय समिती, जाहीरनामा समिती, राज्य मंत्रिमंडळात असणारे मुंबईचे मंत्री, मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते, त्यासोबत माजी खासदार प्रिया दत्त, माजी आमदार अमीन पटेल, जेनेत डिसूजा, उपेंद्र जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. के. सी. वेणुगोपाल यांच्या सहीने काढण्यात आलेल्या या आदेशात छाननी आणि धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी जी समिती करण्यात आली आहे तिच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि सह अध्यक्ष म्हणून मुंबई काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष काम पाहतील. त्यासाठी सचिव म्हणून गणेश यादव यांची नेमणूक करण्यात आली. काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी दिल्लीत काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. लवकरच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांची निवड जाहीर केली जाईल, असेही त्यांनी दिल्लीत सांगितले होते. 

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेसMumbaiमुंबई