शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

Belgaum Election Result:  टी-२० ला लाजवेल असा थरार, अटीतटीच्या लढतीत बेळगावमध्ये भाजपाची जीत, तर काँग्रेसची हार..

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2021 19:54 IST

Belgaum Election Result: शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर प्रमाणे बढत आणि पिछाडी सुरू होती अखेर अंगडी यांनी शेवटच्या एका तासात निर्णायक आघाडी मिळवत विजय संपादन केला.

बेळगाव  - दिवंगत खासदार सुरेश अंगडी यांच्या पत्नी मंगला अंगडी यांनी अटीतटीच्या लढतीत काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांचा पराभव करत बेळगावच्या खासदार पदी विराजमान झाल्या आहेत. काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांचा त्यांनी ५ हजार २४० मतांच्या फरकानं पराभव केला. (BJP's Mangala Angadi beats Congress candidate Satish Jarkiholi in Belgaum ) शेवटच्या एका तासात क्रिकेट सामन्यातील सुपर ओव्हर प्रमाणे बढत आणि पिछाडी सुरू होती अखेर अंगडी यांनी शेवटच्या एका तासात निर्णायक आघाडी मिळवत विजय संपादन केला. भाजपच्या मंगला अंगडी यांना  ४ लाख ४० हजार ३२७ मते मिळाली तर काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी त्यांना जोरदार टक्कर देत  ४ लाख ३५ हजार ८७ मते मिळवली.अपेक्षेप्रमाणे तीन मतदारसंघात प्राबल्य असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके यांना १ लाख १७ हजार १७४ मते मिळाली.

ही मते ठरली निर्णायकमंगला अंगडी यांना माजी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या गोकाक मतदारसंघात 26826 व बेळगाव दक्षिण मध्ये 22857 मतांची मिळालेली आघाडी सतीश जारकीहोळी यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली मात्र मागील लोकसभे पेक्षा भाजपच्या मतात भरपूर कमी आली आल्याने भाजपच्या दृष्टीने हा चिंतेचा विषय आहे. अरभावी मध्ये 15743 तर बेळगाव उत्तर मध्ये 12759 आणि सौन्दत्ती मध्ये 16559 मतांची आघाडी मिळवत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी यांनी जोरदार टक्कर दिली.शुभम शेळके यांना सव्वा लाख मतेलोकसभा पोटनिवडणूकित महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा उमेदवार शुभम शेळके यांनी 124642 मते मिळवत नवीन इतिहास रचला आहे मराठी भाषिकांचे प्राबल्य असलेल्या उत्तर दक्षिण आणि बेळगाव ग्रामीण मतदारसंघात जोरदार मुसंडी मारली आहे. शेळके यांनी भाजपचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दक्षिण बेळगाव मध्ये 44950 बेळगाव उत्तर मध्ये 24594 तर बेळगाव ग्रामीण मधून 45536 मते मिळवत दोन्ही राष्ट्रीय पक्षांचा घाम काढला आहे.

बेळगाव शहरातील टिळकवाडी येथील आर पी डी कॉलेज मध्ये रविवारी सकाळी 8 मतमोजणी सुरू झालो होती कोविड नियमावली यानुसार मतमोजणी सोशल डिस्टन्स वापर करण्यात आला होता.मतमोजणी केंद्रावर सकाळ पासूनच सतीश जारकीहोळी आणि मंगला अंगडी यापैकी कुणीही हजर नव्हते मात्र समितीच्या शुभम शेळके यांनी दोन तीन वेळा मतमोजणी फेरफटका मारला होता.

टॅग्स :belgaum-pcबेळगावBJPभाजपाcongressकाँग्रेस