शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शेती संबंधित उत्पादनांना मोदींच्या सभेत बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 05:07 IST

नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत.

नाशिक : आपल्याच पक्षाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेविषयी अधिक चिंतित असलेल्या राज्य सरकारच्या गृहविभागाने पिंपळगावी होत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत येणाऱ्या श्रोत्यांकडून शेती संंबंधित उत्पादने आणली जाणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले आहेत. गृहविभागाचे हे पत्र म्हणजे मोदी यांच्या सभेत शेतकरी गोंधळ घालण्याची शक्यता अधोरेखित करीत असून, त्यामुळे प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रचंड धास्तावली आहे.गुप्तचर यंत्रणा गेल्या पंधरा दिवसांपासून प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून आहे. असे असले तरी, कांदा व द्राक्षाची बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाºया पिंपळगाव बसवंत येथे होणाºया या सभेत शेतकऱ्यांचा रोष व्यक्त होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कांदा, द्राक्षासह सर्वच शेतीमालाचे गेल्या पाच वर्षांत कोसळलेले भाव त्यामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी यापूर्वीच वेळोवेळी सरकारच्या धोरणांच्या विरोधात रस्त्यावर उतरला असताना आता तर प्रत्यक्ष देशाचा पंतप्रधानच दारी येत असल्यामुळे त्यांच्या समक्षच आपल्या भावना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या सभेत गोंधळ घातला जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे. शिवाय गुप्तचरांकडूनही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे मोदी यांच्या सभेच्या ठिकाणी अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. त्याचबरोबर राज्याच्या गृहखात्याने पोलिसांना गोपनीय पत्र पाठवून ‘शेती संबंधित कोणतीही वस्तू सभास्थळी येणार नाही’ याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.>काळ्या कपड्यांना बंदी२०१४च्या लोकसभानिवडणुकीच्या प्रचारार्थ मोदी यांची तपोवनात सभा झाली होती. त्यावेळीदेखील किमान तीन वेळा त्यांच्या दौºयात बदल करण्यात आला. आता पाच वर्षांनंतर पुन्हा मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ नाशिक जिल्'ाच्या दौºयावर येत आहेत. या वेळी होणाºया सभेत काळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश नाकारण्यात आला असून, प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी करूनच त्यांना सभास्थळी सोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019nashik-pcनाशिक