शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

'अपयशी लोकप्रतिनिधींमुळेच कोकण पर्यटनात मागास'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 06:45 IST

कोकणात आजपर्यंत आमदार, खासदार, मंत्री झाले; मग कोकण कुठल्या कुठे असायला पाहिजे होता.

दासगाव : कोकणात आजपर्यंत आमदार, खासदार, मंत्री झाले; मग कोकण कुठल्या कुठे असायला पाहिजे होता. केरळ, गोवा ही दोन राज्ये पर्यटनावर पुढे गेली; पण कोकण तिथेच आहे, हे येथील लोकप्रतिनिधींचे अपयश आहे, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.या देशाला खोटे बोलणारा माणूस पंतप्रधानपदी मिळाला. नोटाबंदीतून नरेंद्र मोदींनी काय साध्य केले हे माहीत नाही; पण आता निवडणूक लढवण्यास काळा पैसा कुठून आला याचे उत्तर प्रथम दिले पाहिजे. नोटाबंदीतून साडेचार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या. हे सगळे विषय मीडियावर दबाव आणून तुमच्यापर्यंत पोहोचवलेच नाहीत, असा आरोपही त्यांनी के ला.महाराष्टÑ नवनिर्माण सेनेतर्फे राज ठाकरे यांची कोकणस्तरीय पोलखोल सभा महाड येथे शुक्रवारी झाली. या वेळी त्यांनी विविध विषयांना हात घालत शिवसेना-भाजप हे सत्तेसाठी लाचार बनलेले पक्ष आहेत, असे सांगतानाच जवानांच्या नावावर मते मागत फिरणाºया पंतप्रधानांना घरचा रस्ता दाखवा, असे आवाहनदेखील केले. जवानांच्या नावाने मते मागण्याची वेळ पंतप्रधानांवर आली आहे. एवढेच नाहीतर, जवानांचे फोटो लावून प्रचारसभेत भाषण करीत आहेत. अटलजींच्या काळात कारगिल युद्ध झाले; पण अटलजींनी बाजार मांडला नाही. मोदी आणि शहा हे देशावरचे संकट आहे. हे संकट दूर केले पाहिजे. याकरिता सर्वांनी एक होऊन काम करा, असे आवाहन त्यांनी केले.या वेळी खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीदेखील अनंत गीते यांच्या कामाचा समाचार घेतला. कोकणातील रायगडमध्ये अनंत गीतेंच्या नावाने एक निष्क्रिय खासदार लाभला. दिल्लीवरून येणारे थेट मातोश्रीवर देत असल्याने या निष्क्रिय खासदाराला पुन्हा तिकीट दिले गेले आहे, असा आरोप खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी या वेळी केला. भगवा झेंडा उद्धव ठाकरे यांच्या हातात शोभत नाही तर तो केवळ राज ठाकरे यांच्या हातातच शोभतो, असेही खेडेकर यांनी स्पष्ट केले.भाजपचे आमदार आणि एकेकाळचे मनसेचे नेते प्रवीण दरेकर यांनी पेण येथे मनसेवर टीका केली होती. या टीकेचा समाचार मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी घेतला. या वेळी दरेकर यांच्यावर निशाणा साधत राजसाहेबांनी तुम्हाला मोठे केले हे तुम्ही विसरलात. तुम्ही घरभेदी झालात याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील, असे सांगून भाजपने दिलेले शब्द पाळले का हे आधी दाखवा, असे आवाहनदेखील अभ्यंकर यांनी केले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019raigad-pcरायगड