"शिवसेनेला थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड", अतुल भातखळकरांचा थेट हल्ला

By मोरेश्वर येरम | Published: December 17, 2020 04:51 PM2020-12-17T16:51:34+5:302020-12-17T16:59:03+5:30

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय

atul Bhatkhalkar slams shiv sena over kdmc issue | "शिवसेनेला थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड", अतुल भातखळकरांचा थेट हल्ला

"शिवसेनेला थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड", अतुल भातखळकरांचा थेट हल्ला

Next
ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या 'त्या' निकालानंतर अतुल भातखळकर यांचा सेनेवर निशाणाकल्याण-डोंबिवली मनपामधून १८ गावं वगळण्याचा निर्णय रद्दराज्य सरकारच्या निर्णयावर कोर्टाने घेतला आक्षेप

मुंबई
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याच्या राज्य सरकारच्या अधिसूचना मुंबई हायकोर्टाने बेकायदा ठरवून रद्द ठरवल्या आहेत. यावरुन भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर थेट हल्ला केला आहे.

"शिवसेनेला मोठा धक्का; 'ती' १८ गावं पालिकेतच. कल्याण-डोंबिवली महापालिकेतून १८ गावे वगळण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या दोन्ही अधिसूचना मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी बेकायदा ठरवून रद्दबातल केल्या..थपडेवर थप्पड...थपडेवर थप्पड...", असं ट्विट अतुल भातखळकर यांनी केलं आहे. 

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतून १८ गावं वगळण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा निर्णय न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं दिला आहे.

Read in English

Web Title: atul Bhatkhalkar slams shiv sena over kdmc issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.