शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
5
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
6
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
7
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
8
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
9
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
10
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
11
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
12
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
13
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
14
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
15
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
16
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
17
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
18
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
19
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाच्या नियुक्तीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष, 'या' नावाला सर्वाधिक पसंती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2020 22:44 IST

Mumbai Congress president : 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देतांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची काँग्रेस हायकमांडने उचलबांगडी केली होती.

ठळक मुद्देमुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत मनहास व जेष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे.

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : 2022 साली होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीची जोरदार तयारी शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरू केली आहे. मात्र मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची नियुक्तीच अजून जाहीर झालेली नाही, त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीला कसे सामोरे जायचे अशी कुजबुज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उत्तर मुंबईतून संजय निरुपम यांना उमेदवारी देतांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरून त्यांची काँग्रेस हायकमांडने उचलबांगडी केली होती. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसला सपाटून मार खावा लागला होता. त्याची जबाबदारी घेत देवरा यांनी राजीनामा दिल्याचे राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले होते. देवरा यांच्यानंतर माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची मुंबई काँग्रेसचे हंगामी अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली. त्यांनी देखिल वयाची 80 पार केली असून आगामी पालिका निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या आणि पालिका निवडुकीत पक्षाला गतवैभव प्राप्त करून देणाऱ्या मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांच्या प्रतीक्षेत पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे  मुंबई काँग्रेसच्या नव्या अध्यक्षांची नेमणूक हायकमांड कधी जाहीर करणार, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी म्हाडाचे माजी अध्यक्ष डॉ. अमरजीत मनहास व जेष्ठ कामगार नेते भाई जगताप यांच्यात चुरस आहे. माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी मंत्री नसीम खान, चरणजीत सप्रा यांची सुद्धा नावे चर्चेत आहेत. लोकमत ऑनलाइनने या संदर्भात दिलेले वृत्त मुंबईपासून दिल्लीपर्यंत व्हायरल झाले होते. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच के पाटील  यांनी दि. 17 रोजी मुंबई काँग्रेसच्या नवीन अध्यक्षांच्या नेमणुकीबाबत आणि 2022च्या पालिका निवडणुकीच्या तयारीबाबत दादरच्या टिळक भवन येथे काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली होती. सदर  पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा सविस्तर अहवाल ते काँग्रेसच्या हायकमांडकडे ठेवला होता. मात्र अजून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या नियुक्ती जाहीर झाली नसल्याने काँग्रेस  कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. इतर प्रमुख पक्षांनी पालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असतांना काँग्रेस पक्ष पालिका निवडणुकीची तयारी कधी करणार अशी कुजबुज पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. 

सर्वांना घेऊन जाणारा नेता म्हणून डॉ. मनहास यांची ओळख असून मराठी चेहरा आणि आक्रमक कामगार नेते म्हणून भाई जगताप यांची ओळख आहे. संघटनात्मक दृष्ट्या डोक्यावर बर्फ ठेवून आणि जिभेवर साखर ठेवून कार्यकर्त्यांकडून काम करून घेणारा आणि सर्वांना बरोबर घेऊन जाणारा नेता म्हणून डॉ. अमरजीत मनहास यांच्या नावाला सर्वाधिक पसंती मिळाल्याचे समजते. मनहास यांनी गेली 40 वर्षे काँगेस पक्षांशी एकनिष्ठ राहून एनएसयुआय, युवक काँग्रेस, 5 वेळा सिनेट सदस्य,2007 ते 2012 पर्यंत म्हाडाचे अध्यक्ष, तसेच 2003 ते 2015 पर्यंत मुंबई काँग्रेसचे कोषाध्यक्ष होते. 

सध्या मुंबई काँग्रेसचे उपाध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत.  म्हाडाचे अध्यक्ष असतांना 12000 मुंबईकरांना घर दिले होते.तर 2007 च्या पालिका निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे 77 नगरसेवक निवडून आणले होते. त्यांना पक्ष संघटनेचा दांडगा अनुभव असून ते अध्यक्ष म्हणून अधिक यशस्वी ठरतील, असे मत सर्वाधिक जणांनी काँग्रेस प्रभारी एच के पाटील यांच्याकडे मांडल्याचे समजते.  

टॅग्स :congressकाँग्रेसMumbaiमुंबईPoliticsराजकारण