Assembly Elections 2021: पाँडेचेरी गमावले, आसाम-केरळमध्ये हरले; राहुल गांधींच्या नेतृत्वासमोरील प्रश्नचिन्ह वाढले

By बाळकृष्ण परब | Published: May 4, 2021 04:50 PM2021-05-04T16:50:37+5:302021-05-04T16:54:02+5:30

Assembly Elections 2021: पाच राज्यातील निवडणुकीनंतर भाजपाच्या पश्चिम बंगालमधील पराभवाबाबत काँग्रेसकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी या पाच राज्यातील निकालांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वासमोर आणि काँग्रेसच्या भवितव्यासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 

Assembly Elections 2021: Pondicherry loses, loses in Assam & Kerala; The question mark in front of Rahul Gandhi's leadership increased | Assembly Elections 2021: पाँडेचेरी गमावले, आसाम-केरळमध्ये हरले; राहुल गांधींच्या नेतृत्वासमोरील प्रश्नचिन्ह वाढले

Assembly Elections 2021: पाँडेचेरी गमावले, आसाम-केरळमध्ये हरले; राहुल गांधींच्या नेतृत्वासमोरील प्रश्नचिन्ह वाढले

Next
ठळक मुद्देकाँग्रेसला फार अपेक्षा असलेल्या केरळ आणि आसाममध्ये पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागलाकाही महिन्यांपूर्वीपर्यंत सत्ता असलेल्या पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशातही काँग्रेसला पराभूत व्हावे लागले आहेतर बंगालमध्ये गेल्या वेळच्या ४४ जागांवरून काँग्रेस शुन्यावर आली आहे

- बाळकृष्ण परब
नुकत्याच आटोपलेल्या पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत संमिश्र निकाल लागला. पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये स्थानिक पक्ष, केरळमध्ये डावी आघाडी, आसाममध्ये भाजपा आणि पाँडेचेरीमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए असा कौल मतदारांनी दिला. पैकी पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने मिळवलेला विजय विशेष उल्लेखनीय ठरला. या विजयामुळे आसाम, पाँडेचेरीमध्ये भाजपाने, तामिळनाडूत द्रमुक आणि केरळमध्ये डाव्या आघाडीने मिळवलेले यश तसेच काँग्रेसचे (Congress) सार्वत्रिक अपयश झाकोळून गेले. या पाच राज्यातील निवडणुकीनंतर भाजपाच्या पश्चिम बंगालमधील पराभवाबाबत काँग्रेसकडून समाधान व्यक्त करण्यात येत असले तरी या पाच राज्यातील निकालांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वासमोर आणि काँग्रेसच्या भवितव्यासमोर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. (Assembly Election Results 2021)

तामिळनाडूमध्ये द्रमुकचा मित्रपक्ष असूनही काँग्रेसला फार चांगली कामगिरी करता आली नाही. काँग्रेसला फार अपेक्षा असलेल्या केरळ आणि आसाममध्ये पक्षाला दारूण पराभव पत्करावा लागला आहे. तर काही महिन्यांपूर्वीपर्यंत सत्ता असलेल्या पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशातही काँग्रेसला पराभूत व्हावे लागले आहे. तर बंगालमध्ये गेल्या वेळच्या ४४ जागांवरून काँग्रेस शुन्यावर आली आहे. आधीच २०१४ पासून अडखळत असलेल्या काँग्रेससाठी ही बाब चिंता वाढवणारी आहे. पण पाच राज्यांमधील निकालांनंतर याबाबत काँग्रेसच्या कुठल्या नेत्याने चिंता व्यक्त केल्याचे दिसले नाही. 

या पाच राज्यांमधील निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला सर्वाधिक अपेक्षा ह्या आसाम, केरळ आणि पाँडेचेरी या केंद्रशासित प्रदेशामधून होत्या. बंगालमध्ये नेमकी काय भूमिका घ्यायची यावरून द्विधा मनस्थितीत सापडलेला काँग्रेस पक्ष मुख्य स्पर्धेतून आधीच बाहेर पडला होता. अखेर त्याची परिणती भलामोठा भोपळा हातात पडण्यात झाली. तर पाँडेचेरींमध्ये नायब राज्यपालांशी पंगा घेत कारभार केल्यानंतर अखेरच्या दिवसात सरकार पडल्याने सत्तेबाहेर गेलेल्या काँग्रेसला निवडणुकीत फार काही करता आले नाही. 

आता आसामचा विचार केल्यास आसाममध्ये सीएए कायद्याला असलेला विरोध, एनआरसीमधून निर्माण झालेले प्रश्न यामुळे भाजपाला मात देता येईल असा अंदाज काँग्रेसच्या धुरीणांना होता. त्यातच भाजपाची साथ सोडलेले मित्रपक्ष, तसेच बदरुद्दिन अजमल यांच्या एआययूडीएफ या अल्पसंख्याकांच्या पक्षाशीही काँग्रेसने हातमिळवणी केली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काँग्रेससाठी आसाममध्ये जोरदार प्रचार केला. प्रियंका गांधींनी चहाच्या मळ्यांना दिलेली भेट चर्चेचा विषय ठरली होती. मात्र या सर्वाचा काहीही फायदा झाला नाही आणि भाजपा पुन्हा एकदा सहजपणे आसामच्या सत्तेत आला. आसाममध्ये बदरुद्दिन अजमल यांच्या एआययूडीएफशी आघाडी करणे काँग्रेसला महागात पडल्याचे आता बोलले जात आहे. 

दुसरीकडे केरळमध्येही काँग्रेसच्या हाती निराशा लागली. येथे डाव्या पक्षांच्या भक्कम आघाडीसमोर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ या आघाडीची पुरती दाणादाण उडाली. खरंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे केरळमधील वायनाड या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेलेले असल्याने येथून काँग्रेसला फार अपेक्षा होत्या. राहुल गांधींनी प्रचारादरम्यान, विद्यार्थ्याशी साधलेला संवाद, स्थानिकांसोबत घेतलेला मासेमारीचा अनुभव, तसेच दक्षिणेचे लोक उत्तरेपेक्षा राजकीयदृष्ट्या अधिक परिपक्व असतात, असे केलेले विधान चर्चेचा विषय ठरले होते. मात्र राहुल गांधींच्या निवडणुक प्रचार मोहिमेच्या झालेल्या चर्चेचा प्रभाव प्रत्यक्ष मतदानावर झालेला दिसून आला नाही. विजय मिळवणे दूर राहिले, पण डाव्या आघाडीला साधी टक्कर देणेही काँग्रेसला जमले नाही. 

या राज्यांमधील पराभवामुळे देशातील मर्यादित ठिकाणीच प्रभावी राहिलेल्या काँग्रेसची आणखीच पिछेहाट झाली आहे. राष्ट्रीय स्तरावर मोदींना आव्हान देऊ पाहणारे राहुल गांधी हे या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यात पुन्हा अपयशी ठरले. तर प्रियंका गांधींचा करिश्माही मतदारांना काँग्रेसकडे वळवण्याची कामगिरी करू शकला. नाही. एकीकडे मोदी-शाहांच्या नेतृत्वाखालील भाजपा पक्षाचे अस्तित्व नसलेल्या ठिकाणीही त्वेषाने निवडणुका लढवत असताना दुसरीकडे काँग्रेस पक्षा आहे तो जनाधार टिकवण्यासाठीही प्रयत्न करताना दिसत नाही आहे. त्यामुळे येत्या काळात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली या पक्षाची वाटचाल कशी होईल, हा एक प्रश्नच आहे. 

Web Title: Assembly Elections 2021: Pondicherry loses, loses in Assam & Kerala; The question mark in front of Rahul Gandhi's leadership increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.