शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे आणि मोदी यांच्यातील वैयक्तिक भेटीवर अशोक चव्हाण यांची पहिली प्रतिक्रिया...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 19:27 IST

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते.

दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. मुख्यमंत्र्यांसोबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. राज्यातील विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर जवळपास दीड तास बैठक झाली. पण यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातही वैयक्तिक भेट झाल्याची माहिती समोर आली. दोघांमध्ये जवळपास अर्धातास चर्चा झाली. याबाबत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांना विचारण्यात आलं असता त्यांनीही दोन्ही नेत्यांमध्ये वैयक्तिक भेट झाल्याच्या चर्चेला दुजोरा दिला. पण या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नसल्याचं ते म्हणाले. 

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्र्यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे", असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणाबाबत माहिती देताना अशोक चव्हाण यांनी पंतप्रधानांकडे आवश्यक घटनादुरूस्ती करुन सकारात्मक पावलं उचलावीत अशी विनंती केल्याचं सांगितलं. फक्त मराठा आरक्षणच नाही तर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबतही केंद्राने प्रयत्न करावा अशी मागणी करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. 

फडणवीसांवर साधला निशाणापंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत झालेल्या बैठकीच्या मुद्द्यावरुन अशोक चव्हाण यांनी राज्याचे विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदींसोबत आज झालेल्या भेटीबाबत ज्या संघटना विरोधी वक्तव्य करत आहेत, त्या भाजपप्रणित आहेत. विरोधकांनीही आपलं शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांकडे जावं आणि बाजू मांडावी, असं आव्हान चव्हाण यांनी भाजपला दिलं आहे. "पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील भेट राजकीय नव्हती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: त्याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच ही भेट राजकीय तडजोडीसाठी नव्हती. देवेंद्र फडणवीस यांना प्रत्येक गोष्टीत पिवळं दिसतं. त्यांना उलट आनंद वाटला पाहिजे", असा टोला अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.  

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणUddhav Thackerayउद्धव ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदी