शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
3
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
4
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
5
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
6
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
7
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
8
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
9
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
10
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
11
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
12
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
13
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
14
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
15
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
16
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश
17
Adah Sharma : अदा शर्माचं शिक्षण किती?, जगतेय आलिशान आयुष्य; कोट्यवधींची मालकीण, जाणून घ्या, नेटवर्थ
18
फोक्सवॅगन टायगून! 350 किमी चालविली, 1.0 लीटरचे इंजिन, वजनदार... मायलेजने चकीत केले
19
बहिणीचा व्हिडिओ पाहून माधुरी भावूक, 'डान्स दिवाने'मध्ये साजरा झाला 'धकधक गर्ल' चा वाढदिवस
20
२८,२०० मोबाईल हँडसेट ब्लॉक करण्याचे आदेश, २० लाख नंबर्सचं पुन्हा होणार व्हेरिफिकेशन; कारण काय?

ठाकरे सरकारची घमेंड आता जनताच उतरवेल, आशिष शेलारांचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 3:17 PM

Ashish Shelar’s criticised Thackeray government : आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले आहे. आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

मुंबई : राज्यपालांना मुख्यमंत्री कार्यालयाने विमान प्रवासाची परवानगी नाकारल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. यावरून भाजपाने राज्यातील ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवले आहे. आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, अशा शब्दांत भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. (BJP leader Ashish Shelar on Thursday criticised the Maharashtra Vikas Aghadi government led by Uddhav Thackeray for Maharashtra Governor Refused State Plane)

योग्य परवानगी घेऊन राज्यपाल राज भवनावरुन ठरलेल्या प्रवासाला विमानतळावर गेले. विमानतळावर विमानात गेल्यानंतर त्यांना उतरवलं गेले. आज महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने राज्यपालांना विमानातून उतरवलेय, आता महाराष्ट्रातील जनता या तिन्ही पक्षांची घमेंड उतरवेल, असे आशिष शेलार म्हणाले.  याचबरोबर, राज्यपाल हे संविधानिक या राज्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याशी हे सरकार असे वागत असेल तर अन्य लोकं कशी व्यवस्था ठेवणार? राज्यभर अव्यवस्था निर्माण करायची. कुठलीही व्यवस्था योग्य रीतीने चालू द्यायचीच नाही, अशा पद्धतीचा कारभार पहिल्या दिवसापासून हे महाराष्ट्र विकास आघाडीचे ठाकरे सरकार करते आहे, असे  आशिष शेलार म्हणाले.

आम्ही वारंवार पाहिले आहे, केंद्र सरकारने मंजूर केले कायदे आम्हाला नको. अगोदरच्या सरकारने घेतलेल्या निर्णयाचे सर्व प्रकल्प आम्हाला नकोत. अगोदरच्या सरकारच्या काळात महाराष्ट्राच्या विधान सभेने घेतलेल्या निर्णयाला आम्ही तिलांजली देऊ. केंद्र सरकारच्या चौकशीच्या एजन्सीना महाराष्ट्रातील केसेस आम्ही देणार नाही. चौकशीच्या केंद्राच्या रचना योजनांच्या एजन्सिज यांना महाराष्ट्रामध्ये पाय ठेवू देणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आदेश आम्हाला पाळायचे नाहीत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली. 

राज्य सरकारने माफी मागावी – मुनगंटीवारराज्यपालांना विमानातून उतरवण्यात आले, जनता सरकारला सत्तेतून उतरवेल, अशी टीका भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली. इतकेच नाही तर राज्यपालांची राज्य सरकारने माफी मागावी, अशी मागणी मुनगंटीवार यांनी केली. राज्यपालांचे विमान सरकारच्या माध्यमातून नाकारले असेल तर हे बदनामीकारक आहे. लोकशाही व्यवस्थेत हे घडणे योग्य नाही. सरकारकडून असे घडले असेल तर त्यांनी क्षमा मागून हा विषय इथेच थांबवावा. कोणत्या अधिकाऱ्याकडून घडले असेल तर त्याला तात्काळ बडतर्फ करण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारBJPभाजपाState Governmentराज्य सरकारbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी