Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

By प्रविण मरगळे | Published: November 4, 2020 10:31 AM2020-11-04T10:31:57+5:302020-11-04T13:17:50+5:30

Arnab Goswami Arrested, Kangana Ranaut, Shiv Sena News: अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.

Arnab Goswami Arrested: Kangana Ranaut attacks Shiv Sena;criticism on CM Uddhav Thackeray | Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

Arnab Goswami: अर्णबच्या अटकेनंतर कंगना राणौतचा शिवसेनेवर हल्लाबोल; उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका

googlenewsNext
ठळक मुद्देअर्णब गोस्वामींना घरात घुसून पोलिसांनी मारलं, अटक केली, किती घरं तोडणार?कोणाकोणाचे आवाज बंद करणार? सोनिया सेना किती जणांची तोंड बंद करणार?अर्णब गोस्वामी यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा कंगनानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला

मुंबई – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. ठाकरे सरकारने ही सुडबुद्धीने केलेली कारवाई आहे असा आरोप भाजपा नेत्यांनी केला आहे. अन्वेय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणात रायगड पोलिसांनी ही अटक केली आहे. आज सकाळी अर्णब यांना वरळी येथील राहत्या घरातून अटक केली आहे. कलम ३०६ अंतर्गत अर्णबवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतनं पुन्हा एकदा शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. याबाबत कंगनानं ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत शिवसेनेचा सोनिया सेना म्हणून उल्लेख केला आहे. कंगना म्हणाली की, अर्णब गोस्वामींना घरात घुसून पोलिसांनी मारलं, अटक केली, किती घरं तोडणार?, किती जणांचा गळा दाबणार? कोणाकोणाचे आवाज बंद करणार? सोनिया सेना किती जणांची तोंड बंद करणार? असा सवाल कंगनानं उपस्थित केला आहे

तसेच आमच्याआधी किती शहिदांचे गळे कापले, त्यांना लटकवलं गेले आहे. एक आवाज बंद केला तर अनेक आवाज उभे राहतील, पेग्विंन बोलल्यानं राग का येतो? पेग्विंनसारखे दिसता तर बोलणारच, पप्पू सेना म्हटल्यावर राग येतो, तुम्ही सोनिया सेनाच आहात अशी टीका अभिनेत्री कंगना राणौतनं केली आहे.

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. राऊत म्हणाले की, महाराष्ट्र कायद्याचं पालन करणारं राज्य आहे, सबळ पुरावे असतील तर पोलीस कारवाई करू शकतात, ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून कोणावरही सुडबुद्धीने कारवाई केली नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

महाराष्ट्रात आणीबाणीसारखी परिस्थिती; भाजपा नेत्यांचा ठाकरे सरकारवर घणाघात

देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे सरकारवर टीका

आणीबाणी १९७७ मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम! आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक.अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईतील सुप्रसिद्ध इंटेरिअर डिझायनर अन्वेय नाईक याने ५ मे २०१८ रोजी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. अन्वेय नाईक यांच्या मृतदेहाशेजारीच त्यांच्या आईचा मृतदेह आढळला होता. अन्वेय मधुकर नाईक (५३) यांनी आर्थिक विवंचनेतून स्वत: आत्महत्या केली होती. त्यांच्या कॉनकॉर्ड या इंटेरियर डिझायनर कंपनीला व्यवसायात नुकसान झाले होते, त्यामुळे कर्जदार त्याच्याकडे पैशांचा तगादा लावत होते. याच तणावात त्याने आपले व आईचे जीवन संपविण्याचे ठरविले. अन्वेय नाईक यांनी आत्महत्या करण्यापूर्वी रिपब्लिकन टीव्हीचे मालक अर्णब गोस्वामी तर फिरोज शेख व नीतेश सारडा यांनी कामाचे पैसे दिले नसल्यामुळे आत्महत्या करीत असल्याची चिठ्ठी लिहून ठेवली होती. त्यामुळे या तिघांचीही चौकशी पोलिसांमार्फत करण्यात आली होती.

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना पोलिसांनी केली अटक  

Web Title: Arnab Goswami Arrested: Kangana Ranaut attacks Shiv Sena;criticism on CM Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.