शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

धनंजय मुंडे व ‘ती’च्यामधील वाद मध्यस्थ सोडविणार; दोघांनीही वकिलांमार्फत दाखल केले संमतिपत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2021 07:53 IST

दोघेही मध्यस्थीकडे जाऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि मध्यस्थीचा खर्च मुंडे करणार आहेत

मुंबई : महाराष्ट्राचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि त्यांची लिव्ह-इन पार्टनर जिच्यापासून त्यांना दोन मुले झाले तिच्यासाेबतचे वाद सोडविण्यासाठी मध्यस्थी नियुक्त करण्यात आला आहे. या दोघांनी गुरुवारी आपल्या वकिलांमार्फत संमतिपत्र दाखल केले. अटी व शर्ती मंजूर करणे बाकी आहे.

संबंधित महिलेविरोधात धनंजय मुंडे यांनी डिसेंबर २०२० मध्ये उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. तसेच आपले फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट न करण्याचे निर्देश महिलेला द्यावेत, अशी विनंती केली.

हा दावा दाखल करण्यापूर्वी काही महिनेआधी संबंधित महिलेने मुंडे व तिचे फोटो व व्हिडीओ समाजमाध्यमांवर पोस्ट करण्यास सुरुवात केली होती. मुंडे यांनी संबंधित महिलेकडून नुकसानभरपाईचीही मागणी केली. तसेच अंतरिम दिलासा म्हणून संबंधित महिलेला फोटो व व्हिडीओ पोस्ट न करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाला केली. या दाव्यावरील सुनावणी न्या. ए. के मेनन यांच्या एक्सदस्यीय खंडपीठापुढे होती. गुरुवारी मुंडे यांचे वकील शार्दूल सिंग आणि महिलेचे वकील ए. आर. शेख यांनी न्यायालयात संमतिपत्रक दाखल केले. हा वाद सोडवण्यासाठी मध्यस्थीची नियुक्ती केली असून, दोघांनीही त्यासाठी संमती अटी घातल्या आहेत.

खर्च मुंडे करणारदोघेही मध्यस्थीकडे जाऊन वाद सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि मध्यस्थीचा खर्च मुंडे करणार आहेत. मुंडे यांनी मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर संबंधित महिलेच्या बहिणीने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. मुंडे यांच्यावर तिने बलात्काराचा आराेप केल्यानंतर समाजमाध्यमांवर याबाबत माहिती दिली. तसेच यांसदर्भात मुंडे यांच्याविरुद्ध तिने पाेलीस ठाण्यात तक्रारदेखील नोंदवली हाेती. मात्र, त्यानंतर काही दिवसांनी दाखल करण्यात आलेली ही तक्रार तिने मागे घेतली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेPoliceपोलिस