शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
2
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
3
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
4
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
5
दागिन्यांनी मढवलेल्या पत्नीला बुलेटच्या टाकीवर बसवून फिरवलं, पोलिसांनी थेट १६००० हजारांचं चलान कापलं!
6
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
7
नात्यांना काळीमा फासणारी घटना; रेशन कार्ड बनवण्याच्या बहाण्याने घेऊन गेला अन् बायको पोरांना विकून आला!
8
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
9
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
10
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
11
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
13
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
14
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
15
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
16
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
17
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
18
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
19
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
20
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा

जनतेत मोदी विरोधी सुप्त लाट : नितीन राऊत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2019 20:52 IST

राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात दहशतवादी कारवाया वाढल्या, सामुहिक उन्मादामुळे (मॉब लिंचिंग) हत्यांकडाच्या घटनांत वाढ झाली, पुरोगामी विचारवंतांच्या हत्या होऊ लागल्या, देशात काळे धन येण्या ऐवजी नोटबंदीमुळे काळ््याचे पांढरे केले गेले. अशा सर्व घटनांमुळे प्रचारातून विकासाचा मुद्दा हद्दपार झाला आहे. त्यामुळे लोकांना आता मोदी नकोसे झाले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह देशभरात मोदी विरोधी सुप्तलाट असल्याचे मत कॉंग्रेसच्या दलित सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि रोजगार हमीचे माजी कॅबिनेट मंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केले.     राऊत यांनी मंगळवारी (दि. १६) ‘लोकमत’कार्यालयास भेट दिली. या वेळी त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. राऊत म्हणाले, या पुर्वी देशात आलेली सरकारे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व जपणारी होती. मोदी सरकार मात्र देश तोडू पाहत आहे. जम्मू कामीर येथील ३७० कलम काढून टाकणे, नागरिकत्व सुधारणा कायदा, समान नागरी कायदा सरकार आणू पहात आहे. ईशान्य भारताला देखील ३७० कलमासारखा विशेष दर्जा आहे. तेथे मात्र, मोदी वेगळी भूमिका घेताना दिसतात. उलट ईशान्य भारतात वेगळा ध्वज देण्यासही ते तयार आहेत. देशामधे नरेंद्र दाभोलकर, एम. एम. कलबुर्गी, गौरी लंकेश यांसारख्या पुरोगामी आणि विचारवंतांची हत्या होत आहे. गो मांस बाळगल्याच्या संशयावरुन लोकांना मारले जात आहे. सामाजिक उन्मादाच्या घटनांतही वाढ झाली आहे. या सर्वांमुळे नागरिक मोदींविरोधात जाऊ लागले आहेत. त्यामुळे, देशभरात मोदींविरोधात लाट दिसून येत आहे. अगामी लोकसभेच्या निवडणूकीत मोदींविरोधात मतासाठी नागरिक बाहेर पडत असल्याचे राऊत म्हणाले. भाजपाच्या फायद्यासाठीच आंबेडकर आले नाहीत

भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना पाच ते सहा जागा देण्यास आघाडीची तयारी होती. मात्र, त्यांनाच सोबत यायचे नव्हते. त्यांची भूमिका संविधान विरोधी दिसत आहे. अन्यथा भाजपाचा पराभव करण्यासाठी ते आघाडीसोबत असते. उलट, भाजपाच्या फायद्यासाठीच ते आघाडीसोबत आले नसल्याची टीका नितीन राऊत यांनी केली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Rautनितीन राऊतBJPभाजपा