शहरं
Join us  
Trending Stories
1
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
2
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
3
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
4
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
5
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
6
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
7
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
8
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
9
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
10
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
11
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
12
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
13
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
14
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
15
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
16
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
17
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
18
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
19
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
20
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना

पोटनिवडणुकांमध्ये दिसला जनतेचा भाजपाविरोधी कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 06:56 IST

पाच वर्षांपूर्वीच्या नरेंद्र मोदी लाटेत भारतीय जनता पार्टीने झारखंडमधील लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकल्या.

-ललित झांबरेपाच वर्षांपूर्वीच्या नरेंद्र मोदी लाटेत भारतीय जनता पार्टीने झारखंडमधील लोकसभेच्या १४ पैकी १२ जागा जिंकल्या. त्यानंतर झारखंडच्या इतिहासात विधानसभेतही प्रथमच पूर्ण बहुमताचे भाजपा सरकार आले. रघुवर दास यांच्या सरकारने निर्विघ्नपणे पाच वर्षेसुद्धा पूर्ण केली. हेही झारखंडमध्ये पहिल्यांदाच घडले.राजकीय अस्थिरतेमुळे झारखंडचा विकास खुंटला, याबद्दल एकमत असताना गेल्या पाच वर्षांत स्थिर सरकार असूनही झारखंडच्या स्थितीत फारसा फरक पडलेला नाही. जनताही फारशी समाधानी दिसत नाही. गेल्याच वर्षी राज्यात पार पडलेल्या विधानसभेच्या तीन पोटनिवडणुकांत भाजपाला एकही जागा जिंकता आली नाही हे जनतेच्या नाराजीचेच निदर्शक मानले गेले. कोलबीराच्या पोटनिवडणुकीत काँग़्रेसचे यश येत्या काळात काय होणार याचे निदर्शक यासाठी की २०१४ मध्ये याच मतदरासंघात काँग्रेसला केवळ ८.६६ टक्के मते, भाजपाला २५.७४ आणि झारखंड पार्टीला ३९.५८ टक्के मते होती मात्र पोटनिवडणुकीत काँग़्रेसनेच ३३.९३ टक्के मते मिळवून दाखवली आणि त्यामुळे लोकसभा निवडणुका २०१४ प्रमाणे एकतर्फी नसतील असा इशाराच भाजपाला मिळाला.गेल्या राज्यसभा निवडणुकीपासून काँग़्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा यांच्यात जवळीक वाढत चालली असल्याचे संकेत स्पष्टपणे दिसत आहेत. त्यामुळे भाजपाला लोकसभा निवडणुकांमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे. भाजपाच्या नेत्यांनाही बहुधा याची जाणीव आहे म्हणूनच मुख्यमंत्री रघुवर दास यांनी २०१९-२० च्या अर्थसंकल्पात सर्वांना सुखावणाऱ्या घोषणा केल्या आहेत. त्यात मुख्यमंत्री सुकन्या योजना, मुख्यमंत्री मेधा शिष्यवृत्ती योजना, शेतकºयांसाठी मुख्य्यमंत्री कृषी आशीर्वाद योजना, महिला सशक्तीकरणासाठी स्वतंत्र अर्थसंकल्पासह ८८९८ कोटी रूपयांची तरतूद यांचा समावेश आहे. याशिवाय एम्सची निर्मिती, सध्याच्या तीनशिवाय राज्यामध्ये आणखी पाच वैद्यकीय महाविद्यालये, प्रत्येक जिल्ह्यात कोल्डरूम अशा घोषणा राज्य सरकारने केल्या आहेत. परंतु पोटनिवडणुकांचे निकाल, झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसची झालेली जवळीक आणि हेमंत सोरेन यांनी बदललेला झामुमोचा चेहरामोहरा पाहता आगामी लोकसभा निवडणुकांत भाजपाला गेल्या वेळेसारखेच घवघवीत यश मिळणे अवघडच दिसत आहे.अंडी योजना ठरणार नामुष्कीची!रघुवर दास यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात बºयाच लोकप्रिय घोषणा केल्या असल्या तरी केंद्र व राज्यात भाजपाचेच बहुमताचे सरकार असूनही केवळ त्यांना निधीअभावी माध्यान्ह शालेय पोषण आहाराद्वारे विद्यार्थ्यांना आठवड्याला तीन अंडी देण्याची योजना गुंडाळावी लागली.झारखंड हे आदिवासीबहुल राज्य आहे आणि राज्यात कुपोषणाची समस्या गंभीर असताना भाजपा सरकार अंडीसुद्धा पुरवू शकत नाही, तर इतर योजनांची काय स्थिती असेल? असे असूनही भाजपा सरकारने राज्यात दरवर्षी दरडोई उत्पन्न वाढत असल्याचा दावा केलेला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस