अण्णा हजारे म्हणतात, "ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा"

By बाळकृष्ण परब | Published: November 8, 2020 09:17 AM2020-11-08T09:17:37+5:302020-11-08T09:22:27+5:30

Anna Hazare News : राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे.

Anna Hazare criticize Thackeray government | अण्णा हजारे म्हणतात, "ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा"

अण्णा हजारे म्हणतात, "ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा"

googlenewsNext
ठळक मुद्देलोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिलीमुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाहीमुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले

मुंबई - शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येत आघाडी करून स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला या महिन्याच्या अखेरीस एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा, अशी परिस्थिती आहे, असा टोला अण्णांनी लगावला आहे.

एबीपी माझा ह्या वृत्तवाहिनीच्या माझा कट्टा या कार्यक्रमात संवाद साधताना अण्णांनी ही टीका केली. लोकायुक्तांच्या नियुक्ती कायद्यासाठी मी राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांना पत्र लिहिली. पण मुख्यमंत्र्यांचा अपवाद वगळता कुणीही पत्राला उत्तर दिले नाही, असे अण्णा हजारेंनी सांगितले.

यावेळी अण्णा हजारेंनी महाविकास आघाडीच्या कारभारावरही टीका केली. ते म्हणाले की, ठाकरे सरकार म्हणजे चलती का नाम गाडी, थांबली तर खटारा असा कारभार चालला आहे. लोकपालनंतर लोकायुक्त कायदा करायचा आहे. पण मुख्यमंत्री वगळता इतर मंत्र्यांकडून त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. तसेच मुख्यमंत्र्यांनीही कोरोनानंतर याबाबत पावले उचलू असे सांगितले.

दरम्यान, लोकायुक्त कायदा न झाल्यास पुन्हा आंदोलनाचे रणशिंग फुंकणार असल्याचा इशाराही अण्णा हजारे यांनी दिला आहे. त्यामुळे आता अण्णा पुन्हा एकदा लोकायुक्तांचा मुद्दा चर्चेत आणणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Web Title: Anna Hazare criticize Thackeray government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.