शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
4
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
5
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
6
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
7
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
8
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
9
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
10
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
11
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
12
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
13
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
14
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
15
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
16
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
17
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

'अमर, अकबर, अँथनी'ने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केला'; काँग्रेसचा भाजपला टोला

By मोरेश्वर येरम | Published: December 04, 2020 4:01 PM

भाजपच्या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजपचा भ्रमाचा भोपळा फुटला, सचिन सावंत यांचा घणाघातनागपुरचा ५५ वर्षांपासूनचा गड भाजपला राखता आला नाहीमहाविकास आघाडीला मिळालेलं एकीचं फळ यापुढेही मिळत राहील, सावंत यांचा विश्वास

मुंबईराज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीने यश मिळवलं. तर भाजपला सपाटून मार खावा लागला आहे. भाजपच्या या पराभवावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जोरदार टीका केली आहे. "अमर, अकबर, अँथनीने 'रॉबर्ट सेठ'चा आज पराभव केला", असा उपरोधिक टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवर एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात ते म्हणतात की, "भारतीय जनता पक्ष नेहमी महाविकास आघाडी सरकारला अमर, अकबर, अँथनींचं सरकार असं म्हणत होतं. अमर, अकबर, अँथनी जरा हिट चित्रपट होता. त्याचपद्धतीने महाविकास आघाडीचं कॉम्बिनेशन आता हिट झालं आहे आणि अमर, अकबर, अँथनीने 'रॉबर्ट सेठ'चा पराभव केलाय एवढं मात्र निश्चित आहे"

पदवीधरच्या निवडणुकीत ६ पैकी ४ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळालं आहे. तर भाजपला मतदारांनी सपशेल नाकारलं आहे. भाजपने याआधी सर्व जागांवर यश मिळेल असा दावा केला होता. त्यावरही सचिन सावंत यांनी निशाणा साधला आहे. "देशहितासाठी भाजपला सत्तेपासून दूर ठेवणं या कारणासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले होते. आज त्या एकोप्याचं फळ आघाडीला मिळालं आहे. भाजपच्या १०५ जागांच्या १५० जागा होतील अशा वल्गना फडणवीस करत होते. तो भ्रमाचा भोपळा फुटलेला आहे. गेली ५५ वर्ष नागपुरात भाजपचा गड होता. तो गड त्यांना राखता आला नाही", असं सावंत म्हणाले.  

टॅग्स :Sachin sawantसचिन सावंतcongressकाँग्रेसUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार