शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Devendra Fadnavis: सर्व पुरावे बंद लिफाफ्यात गृह सचिवांना दिलेत, आता योग्य ती कारवाई होईल: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 18:14 IST

All the evidence was given to the Home Secretary in a sealed envelope now appropriate action will be taken says Devendra Fadnavis : राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार त्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. "मी माझ्या जवळीस सर्व पुरावे एका बंद लिफाफ्यात केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत आणि या प्रकरणासंदर्भात माझ्याकडे असलेली सर्व माहिती मी त्यांना सांगितली आहे. त्यासोबतच याची सीबीआय चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे", अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांच्या भेटीनंतर प्रसार माध्यमांना दिली.  (All the evidence was given to the Home Secretary in a sealed envelope, says Devendra Fadnavis)

महाराष्ट्रात पोलिसांच्या बदल्यांचं रॅकेट सुरू असून यासंदर्भातील कॉल रेकॉर्डिंग आणि इतर सबळ पुराव्यांसकट एक अहवाल तत्कालीन गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांनी राज्य सरकारला दिला होता. पण त्यावर अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. त्यामुळेच हे सारे पुरावे आता केंद्रीय गृहसचिवांना दिले आहेत, असं फडणवीस म्हणाले. 

गृहसचिवांनी दिलं कारवाईचं आश्वासन"केंद्रीय गृहसचिवांनी माझं सर्व बोलणं ऐकून घेतलं आणि सर्व पुराव्यांची पडताळणीकरुन लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन दिलं आहे", असंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. 

राज्य सरकार कुणाला वाचवतंय?पोलिसांच्या बदली संदर्भातील रॅकेट चालवलं जात असल्याचा अहवाल २५ ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडे देण्यात आलेला असतानाही त्यावर अद्याप कोणतीच कारवाई सरकारनं का केली नाही? त्या अहवालावर काहीच कारवाई न करता सरकार नेमकं कुणाला वाचवू पाहायतंय?, असा सवाल फडणीस यांनी यावेळी उपस्थित केला. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसParam Bir Singhपरम बीर सिंगMumbai policeमुंबई पोलीसAnil Deshmukhअनिल देशमुखRashmi Shuklaरश्मी शुक्ला