शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

Ajit Pawar: ठाकरे सरकारमध्ये मतभेद; यशोमती ठाकूरांकडून अजित पवारांविरोधात नाराजी व्यक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 09:50 IST

Yashomati Thakur: राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हे आम्हाला साथ देत नसल्याची खंत महिला व बालकल्याणमंत्री यशोमती ठाकूर यांनी शनिवारी एका कार्यक्रमात व्यक्त केली. यानिमित्ताने राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीमधील मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

राष्ट्रीय महामार्गावरील एका हॉटेलमध्ये बाळापूर तालुक्यातील अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचा संवाद कार्यक्रम महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व ठाकूर यांच्या उपस्थितीत पार पडला. त्यावेळी त्या म्हणाल्या, मागील कित्येक वर्षांपासून बालसंगोपनाचे पैसे वाढवले नव्हते. केवळ ४५० रुपये मिळत होते. आपण त्यात वाढ करून ११२५ रुपये केले. यासाठी किमान २५०० रुपये मिळायला हवे, अशी माझी इच्छा आहे. तसा प्रस्तावही आम्ही मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठविला. मात्र, अजित पवार काही आम्हाला साथ देत नाहीत. थोरात यांनी याबाबत मदत केल्यास त्यांचीही साथ मिळेल, असे ठाकूर म्हणाल्या. 

शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करणार - थोरातराष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी जमीन संपादित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या. यासंदर्भात मुंबई येथे अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर करू, अशी ग्वाही महसूलमंत्री थोरात यांनी दिली. तसेच उच्चदाब विद्युत मनोऱ्यांमुळे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरAjit Pawarअजित पवार